Leaders and milk producers discuss the future of Gokul Milk Union amid rising political tensions in Maharashtra’s cooperative sector. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gokul Milk Union Politics: नेत्यांचं राजकारण उठलं 'गोकुळ'च्या मुळावर; प्रशासक राजसाठी अदृश्‍य शक्ती मोठ्या ताकदीने प्रयत्नशील

Gokul milk union election issue: राजकारणात कोणी कोणाचे मित्र नसते तर कोणी कोणाचे कायमचे शत्रू नसते. राजकारण करणाऱ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. राजकरणातून काही संस्थांना कुलूप लागू शकते. ज्या संस्थेच्या भक्कम इमारती उभ्या आहेत. पारदर्शी काम सुरू आहे अशा संस्थांची नावे सुद्धा अवसायनाच्या यादीत आली आहेत.

लुमाकांत नलवडे

Kolhapur News, 03 Apr : सध्या जिल्ह्यातील राजकारण गोकुळ संघाच्या मुळावर उठत आहे. क्रियशील आणि अक्रियशील संस्था अपात्र ठरवण्यासाठी 10 वर्षापूर्वीही असा मुद्दा पुढे आला होता. मात्र त्यावेळी सर्व नेत्यांनी ‘संस्था आणि दूध उत्पादक’ गोकुळचे ‘माय बाप’ आहेत, त्यांना दुखावू नका असा सल्ला दिला होता.

आता त्याच्या उलटे काम संघाचे अदृश्‍य विरोधक करीत आहेत. संस्था अपात्र ठरवण्याच्या प्रक्रियेत गोकुळ संघावर प्रशासक आणण्याचे प्रयत्न सहकाराला मारक आहेत. दूध उत्पादक संस्था आहेत म्हणून गोकुळचा नावलौकिक आहे. केवळ सत्तेच्या लालसेपोटी कोणीही चुकीची पाऊल उचलणे हे गोकुळच्या आणि पर्यायाने दूध संस्थांच्या मुळावर उठल्यासारखे आहे.

राजकारणात कोणी कोणाचे मित्र नसते तर कोणी कोणाचे कायमचे शत्रू नसते. राजकारण करणाऱ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. राजकरणातून काही संस्थांना कुलूप लागू शकते. ज्या संस्थेच्या भक्कम इमारती उभ्या आहेत.

पारदर्शी काम सुरू आहे अशा संस्थांची नावे सुद्धा अवसायनाच्या यादीत आली आहेत. दूध संस्था चालकांच्या प्रामाणिक हेतूला काही राजकारणी मंडळी स्वतःच्या स्वार्थासाठी कुलूप लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. सहकार क्षेत्रासाठी हे धोकादायक आहे.

पक्ष बदलून सत्तेत येता येते. पण एखादी दूध संस्था उभी करून ती टिकविण्यासाठी अनेकांनी घाम गाळलेला असतो. दूध उत्पादकांचा विश्‍वास मिळविलेला असतो. त्याला मातीमोल करण्याचा प्रयत्न काही राजकारणातून होत आहे. कोणत्याही परिस्थितीत गोकुळ संघावर प्रशासक राज आलेच पाहिजे यासाठी अदृश्‍य शक्ती मोठ्या ताकदीने प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.

यासाठी सत्तेचा वापर होत असल्याचे दिसून येते. निवडणुकीसाठी कोणतीही स्थगिती नसतानाही कार्यक्रम जाहीर केला जात नाही. टाळाटाळ केली जाते. कोणाला प्रशासक राज पाहिजे आहे हे आता दिसून येत आहे. थेट निवडणुकीला सामोरे न जाता प्रशासकीय राज आणण्याचा घाट सहकार क्षेत्राला धक्का पोहचविणारा आहे.

राजकारण तुमच्या पुरते मर्यादीत ठेवा, प्रामाणिक संस्थांच्या मुळावर उठू नका, हा सर्वसामान्य संस्था चालकांचा उद्रेक नक्कीच योग्य आहे. बनावट संस्था अपात्र जरुर ठरल्या पाहिजेत. मात्र मूळ संस्थांना धक्का लागता कामा नये. निवडणूक झालीच पाहिजे. सहकारात राजकारणाचे जोडे बाहेर ठेवा, अन्यथा उरल्या सुरल्या संस्थाही बंद होतील, हे आता पुन्हा एकदा सांगण्याची वेळ आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT