Gokul News : अनेक दिवसांपासून गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून आरोप-प्रत्यारोप, राजकारण सुरु आहे. अशात पुन्हा एकदा गोकुळच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. सहकार विभागाकडून निवडणुकीची प्रक्रिया अधिकृतपणे सुरु करण्यात आली आहे. यानुसार, 2 जून ते 1 जुलै 2026 या कालावधीत ठराव दाखल करण्याची मुदत दुग्ध निबंधक यांच्याकडून देण्यात आली आहे.
गोकुळ दूध संघातील कथित अवसयानातील 1308 दूध संस्थांची सुनावणी पूर्ण झाल्यानंतरच निवडणूक घ्या असे आदेश कोल्हापूर सर्किट बँकेने दिले होते. ही चौकशी 80 दिवसांत पूर्ण करावी, असे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले होते. जवळपास 800 ते 900 दूध संस्थांची सुनावणी पूर्ण झाली आहे. येत्या 15 जून पर्यंत ही सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. याच दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानेही 90 दिवसांमध्ये निवडणूक घ्या असे निर्देश दिले.
यानुसार, जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था राजकुमार पाटील यांनी गोकुळ दूध संघाला महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. या आदेशामुळे गोकुळ दूध संघाची निवडणूक येत्या तीन महिन्यात लागण्याची शक्यता आहे. 26 मे ते 1 जून पर्यंत गोकुळ दूध संघाशी संलग्न असणाऱ्या प्राथमिक सहकारी दूध संस्थांनी मतदारयादीत समाविष्ट करण्यासाठी पत्र पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तर 2 जून ते 1जुलैपर्यंत दूध संस्थेच्या वतीने नियुक्त करणाऱ्या प्रतिनिधीचा ठराव दुग्ध निबंधक सहकारी संस्थांकडे पाठवावा असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे गोकुळ दूध संघाची निवडणूक येत्या दोन ते तीन महिन्यात लागण्याची शक्यता आहे. संस्थेने प्रतिनिधी ठराव पाठवल्यानंतर दुग्ध निबंध कार्यालयाकडून प्रारूप मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर प्रारूप यादीवर हरकती आणि त्यानंतर अंतिम यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.