Kolhapur Shetkari Sangh Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shetkari Sangh : मुदत संपली तरी राजीनामा नाही, शेतकरी संघांचे राजकारण पेटले; नेत्यांची बोलावली तातडीची बैठक

Kolhapur Politics News : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ गट विरुद्ध महाडिक गट असा वाद गोकुळमध्ये धुमसत असताना आता शेतकरी संघाचे राजकारण देखील तापले आहे. शेतकरी संघामध्ये मुदत संपूनही अध्यक्षांनी राजीनामा न दिल्याने राजकारण ढवळून निघाले आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ गट विरुद्ध महाडिक गट असा वाद गोकुळमध्ये धुमसत असताना आता शेतकरी संघाचे राजकारण देखील तापले आहे. शेतकरी संघामध्ये मुदत संपूनही अध्यक्षांनी राजीनामा न दिल्याने राजकारण ढवळून निघाले आहे. अध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर संचालकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे संचालकांच्या बैठकीकडे देखील अनेकांनी पाठ फिरवली आहे. दरम्यान या संदर्भात नेत्यांनी दखल घेतली असून जिल्हा बँकेत सोमवारी तातडीची बैठक आयोजित केली आहे.

शेतकरी संघाचे विद्यमान अध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी ठरल्याप्रमाणे मुदत संपूनही राजीनामा दिलेला नाही. शिंदे यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे संचालक मंडळामध्ये नाराजी आहे. 11 संचालकांनी संचालक बैठकीकडे पाठ फिरवली. त्यामुळे संचालकांनी वरिष्ठ नेत्यांकडे दाद मागितल्यानंतर नेत्यांनी याची दखल घेतली आहे. सोमवारी जिल्हा बँकेत त्या संदर्भात सायंकाळी सहा वाजता बैठक होणार आहे.

अडीच वर्षांपूर्वी कोल्हापूर शेतकरी संघाची निवडणूक झाली. शेतकरी संघात पहिल्यांदाच सर्व नेते एकत्र येत सत्ता स्थापन केली. सर्वच पक्षांना एक एक वर्ष अध्यक्ष पद देण्याचे निश्चित झाले. पहिले अध्यक्ष पद राष्ट्रवादीचे (NCP) प्रवीणसिंह पाटील झाले. पाटील यांनी मुदत संपल्यानंतर ही तीन महिने राजीनामा दिला नाही. तीन महिन्यानंतर राजीनामा दिल्यानंतर अध्यक्षपद जनसुराज्य शक्तीकडे गेले.

एक वर्षाचा कालावधी संपल्यानंतर बाबासाहेब शिंदे यांनी राजीनामा देणे अपेक्षित होते. मात्र, जोपर्यंत मला नेत्यांचा आदेश येत नाही तोपर्यंत राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले. सध्या संचालक मंडळात भाजपचे (BJP) चार संचालक तर काँग्रेसचे दोन संचालक आहेत. त्यामुळे आता भाजपला संधी आहे. त्यानंतर काँग्रेसला संधी मिळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT