Amal Mahadik  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Gokul dairy news : 'स्वतःचं झाकायचं अन् दुसऱ्याचं...'; गोकुळच्या राजकारणात उडी घेत आमदार महाडिकांचा बड्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल

Gokul dairy political conflict : गोकुळच्या राजकारणात उडी घेत आमदार महाडिक यांनी मंत्री मुश्रीफ गटावर जोरदार टीका केली. पाच वर्षांच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी करत अनेक गंभीर आरोप केले.

Rahul Gadkar

एरवी इतरांनी केलेल्या आरोपावर प्रत्युत्तर न देण्याची भूमिका घेणारे आमदार अमल महाडिक यांनी गोकुळ दूध संघाच्या राजकारणात उडी घेतली आहे. गोकुळ दूध संघाच्या राजकारणावर पहिल्यांदा बोलताना आमदार महाडिक यांनी मंत्री मुश्रीफ गटाला चांगलेच झापले आहे. विरोधकांनी आपले झाकून ठेवले आहे. आणि दुसऱ्यांकडे वाकून बघत आहेत. असा टोला आमदार अमल महाडिक यांनी लगावला.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने विरोधक बिनबुडाची टीका करत असून, प्रत्येक गोष्टीचे राजकीय भांडवल केले जात आहे. गोकुळच्या कारभाराची चौकशी होण्यास आपली काहीच हरकत नाही. पण, यापूर्वी ज्यांची पाच वर्ष संघावर सत्ता होती, त्यांच्याही कारभाराची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आमदार अमल महाडिक यांनी केली.

शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांनी आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करावी. मुख्यमंत्री त्यांच्या सर्व शंका दूर करतील. कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणे गरजेचं आहे, लवकरच मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा करू, असेही ते म्हणाले.

आमदार सतेज पाटील यांच्याबाबत बोलताना, ते एका कारखान्याचे चेअरमन आहेत, मीही एका कारखान्याचा चेअरमन आहे, ते अन् मी जिल्हा बँकेतही संचालक आहोत.त्यामुळे निश्चितपणे आमच्या भेटी होतात, चर्चा होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT