Prafull Patel Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gondia Congress News : प्रफुल्ल पटेलांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला खिंडार; तालुकाध्यक्षांसह तीनशे कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Gondia Politics : सामान्य कार्यकर्त्यांची धुसफूस सुरू होती.

Mangesh Mahale

Gondia : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर गोंदिया जिल्हा त्याला अपवाद होता. मात्र, तीन महिन्यांनंतर राष्ट्रवादीला खिंडार पडले आहे. गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या सालेकसा तालुक्यातील युवक राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्ष रोहित बनोटे यांच्यासह जवळपास ३०० कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीला गोंदियात हा मोठा धक्का बसला आहे.

राष्ट्रवादीसह महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल हटवार यांनीदेखील आपल्या १०० कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे, तर भाजपच्यादेखील 50 कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला आहे. काँग्रेसचे देवरी-आमगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सहसराम कोरोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पक्षप्रवेशानंतर देवरी आमगाव विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला बळ मिळाला आहे. राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

गेल्या दोन जुलैला महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा राजकीय भूकंप झाला. अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले. मात्र, गोंदिया जिल्हा हा प्रफुल्ल पटेल यांचा गृह जिल्हा असल्याने राष्ट्रवादीत कुठेही फूट पडल्याचे पाहायला मिळाले नाही.

या फुटीनंतर वरिष्ठ स्तरावर शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांना एकत्रित येऊन काम करावे लागले. राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना सोबत काम करत असताना सामान्य कार्यकर्त्यांची धुसफूस सुरू होती. भाजप कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना त्रास होत असल्याची चर्चा होती. भाजपने खासगीकरण करण्याचा सपाटा सुरू केल्यामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT