Dattatreya Bharne
Dattatreya Bharne Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राज्यातील बेरोजगार युवकांसाठी आनंदाची बातमी : दत्तात्रेय भरणेंनी जाहीर केला हा मोठा निर्णय

सरकारनामा ब्युरो

मुंबई - मुंबईत विधीमंडळात अर्थसंकल्पिय सभा सुरू आहे. यात विधानसभेत प्रश्नोत्तर तासात शासकीय नोकर भरतीचा विषय आमदार राहुल कुल ( Rahul Kul ) यांनी उपस्थित केला. यावर राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे ( Dattatreya Bharane ) यांनी मोठी घोषणा केली आहे. ( Good news for unemployed youth in the state: This is a big decision announced by Dattatreya Bharane )

आमदार राहुल कुल यांनी प्रश्नोत्तर तासात राज्यातील शासकीय नोकरीतील अनुशेष व ओबीसी आरक्षणाबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे म्हणाले की, मागील वर्षापर्यंत शासकीय नोकरीत सुमारे 8 लाख 77 हजार जागांचा अनुशेष होता. 30 जुलै 2021च्या शासन निर्णयानुसार रिक्तपदांची भरती होईल. या संदर्भात सात हजार 967 पदांसाठी मागणीपत्र राज्य लोकसेवा आयोगाला पाठविले आहे. दोन वेळा राज्य लोकसेवा आयोगाला स्मरणपत्रे पाठविली आहेत.

मंत्री भरणे पुढे म्हणाले की, कोरोना संकटामुळे मागील दोन वर्षांपासून भरती प्रक्रिया राबविता आलेली नाही. सध्या 15 हजार 426 पदाचा अनुशेष आहे. मागील सहा महिन्यांत सहा हजार 400 पदासाठी सुमारे 300 जाहिराती दिल्या आहेत. आगामी 15 दिवसांत आणखी पदभरतीच्या जाहिराती देणार आहोत. लवकरात लवकर ही पदे भरण्यात येतील अशी ग्वाही मंत्री भरणे यांनी दिली.

यावर नाना पटोले म्हणाले की, लोकसेवा आयोगाकडून वर्ग एकची पदभरती होते. खरे तर वर्ग दोन व वर्ग तीन कर्मचारी मोठ्या प्रमाणात काम करतात. पदोन्नतीतूनही वर्ग एकची पदे भरता येतात. राज्यात मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांचा अनुशेष आहे. विविध विभागातील 2 लाख 3 हजार 302 पदे सर्व विभागात रिक्त आहेत. विधीमंडळातही कर्मचारी कमी आहेत. राज्य शासनाने सकारात्मक विचार करून ताबडतोब भरती प्रक्रिया राबवावी अशी मागणी, नाना पटोले यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT