महाराष्ट्र एकीकरण समिती/बेळगाव 
पश्चिम महाराष्ट्र

महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवींना फासले काळे

या घटनेच्या निषेधार्थ सीमाभागातील मराठी जनतेने मंगळवारी (१४ डिसेंबर) बेळगाव (Belgaum) बंदची हाक दिली आहे

सरकारनामा ब्युरो

बेळगाव : बेळगाव येथील मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे (Maharashtra ekikaran Samiti) अध्यक्ष दीपक दळवी (Dipak Dalavi) यांना काही गुंडांनी काळे फासल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सीमाभागात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. या घटनेचा निषेध म्हणून सीमाभागातील मराठी जनतेने मंगळवारी (१४ डिसेंबर) बेळगाव (Belgaum) बंदचा निर्णय समितीने जाहीर केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाला आज सोमवारपासून प्रारंभ होत आहे. मात्र मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी हे अधिवेशन भरविले जात असल्याचा आरोप मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने (Maharashtra ekikaran Samiti) केला. याच्या निशेधार्थ समितीच्या नेतृत्वाखाली टिळकवाडीतील व्हॅक्सिन डेपो येथे महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

परंतू आज सकाळी मनपा अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी महापालिकेच्या परवानगीशिवाय या ठिकाणी मंच उभारता येणार नसल्याचे सांगत तो हटविण्याचा प्रयत्न केला. मात्र समितीच्या नेत्यांनी मंचावरच ठिय्या आंदोलन छेडले. मात्र यावेळी पोलिसांसमोरच करवे कार्यकर्त्यांनी समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या अंगावर शाल टाकून तोंडाला काळे फासले.

सीमाभागातील मराठी जनतेला कायद्याचे धडे देणाऱ्या कर्नाटकी पोलिसांनी करवेच्या गुंडांना मात्र अभय दिल्याने याठिकाणी मराठी जनतेत संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ उद्या बेळगाव बंदची हाक दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT