Gopichand Padalkar, Sangram Jagtap, hate speech sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gopichand Padalkar : पडळकरांविरोधात ख्रिश्चन-मुस्लिम आक्रमक, संतापाचा उडाला भडका; अजितदादांचा आमदाराही अडचणीत?

Sangli Muslim protest aganist Gopichand Padalkar : गेल्या काही दिवसांपासून भाजपचे आमदार गोपिचंद पळकर आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार) आमदार संग्राम जगताप हे अल्पसंख्यांक समाजाच्या विरोधात गरळ ओकत आहेत. यावरून आता सांगलीसह विविध जिल्ह्यात रोष व्यक्त केला जातोय.

Aslam Shanedivan

Sangli News : गेल्या काही दिवसापासून म्हणजेच राज्याच पुन्हा एखदा महायुतीचे सरकार, देवाभाऊंचे सरकार आल्यापासून सत्तेतील आमदार आणि मंत्री अल्पसंख्यांक समाजांच्या बद्दल द्वेष करणारे विधान करत आहेत. आता देखील भाजपचे आमदार गोपिचंद पळकर आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप अशीच विधाने करत असून ते ख्रिश्चन आणि मुस्लिम समाजाबद्दल गरळ ओकण्याचे काम करत आहेत. यावरून राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली असतानाच सांगलीत मुस्लिम समाजाने मोर्चा काढत धरणे आंदोलन केले. तसेच या दोन्ही आमदारांवर कायदेशील कारवाई व्हावी, यासह पडळकर यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी मुस्लिम समाजातील सलीम राज पन्हाळकर, सोहेल इनामदार, सनाउल्ला बावचकर, हाफिज मोहम्मद अली मुल्ला, आक्रम शेख, टिपू इनामदार, आसिफ पठाण, जावेद मुल्ला, आसिफ पठाण, जावेद मुल्ला, मुद्दसर मुजारव, राज शेख, अब्दुल रज्जाक तांबोळी, इब्राहिम बोजगर, मोहसीन शेख, मुन्ना पठाण, निहाल कुरेशी आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मागील काही दिवसांपासून जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार व भाजप नेते गोपीचंद पडळकर तसेच संग्राम जगताप यांनी अल्पसंख्याक समाजाविषयी बेताल वक्तव्य करण्याचे काम सुरू केले आहे. ते सूड बुद्धीने अल्पसंख्यांकांवर (मुस्लिम) आरोप करत असतात. अल्पसंख्याक समाजाला सातत्याने बदनाम करण्याचा प्रयत्न या दोघांनी केल्याने आता समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. याचे पडसाद सांगलीतसह जालन्यात उमटले.

एकीकडे ख्रिश्चन धर्मगुरूंबाबत एक वादग्रस्त केल्यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर अडचणीत आले आहेत. राज्यभरासह जालन्यातील ख्रिश्चन समाज रस्त्यावर उतरला आहे. सांगली, अहिल्यानगर, भंडारा, उल्हासनगरसह जालन्यात ख्रिश्चन समाजाने मोर्चे काढत पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी लावून धरली आहे. अशातच आता सागलीत पडळकरांच्या विरोधात मुस्लिम समाजाने देखील रस्त्यावरची लढाई सुरू केली आहे.

जालन्यात पडळकरांच्या विरोधात बहुजन वंचित आघाडी आक्रमक झाली असून त्यांना मराठवाड्यात फिरू देणार नाही अशी भूमिका घेतली आहे. तर समाजाचा विरोध डावलून ते मराठवाड्यात आले तर त्यांच्या तोंडाला काळेच फासू असाही इशारा जालन्यातील वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी दिला आहे.

तर दुसरीकडे पडळकर व जगताप यांनी अल्पसंख्याकांना जाणीवपूर्वक व वारंवार नाहक त्रास दिल्यावरून सांगलीत मुस्लिम समाज आक्रमक झाला आहे. पडळकर व जगताप यांच्यावर कारवाई व्हावी. तसेच पडळकरांची आमदारकी रद्द करावी, अशी जोरदार मागणी समाजाने केली आहे. यामुळे राज्यात पडळकरांना धार्मीक द्वेष पसरवणारे वक्तव्य केल्याने अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

11 लाखाचं बक्षीस

यावेळी डेव्हिड घुमारे यांनी सरकारवर हल्लाबोल करताना, सत्तेतील एखादा आमदार खून केला तर 11 लाखाचं बक्षीस देतो असं म्हणतो म्हणजे सत्ताधाऱ्यांना सुपारी देऊन हत्या करण्याची खुली सूट दिली आहे का? असे म्हणत पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी. त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

नेमकं काय म्हणाले होते पडळकर ?

सांगली येथील ऋतुजा नावाच्या गर्भवती महिलेला धर्मांतर करण्यासाठी ख्रिश्चन पादरी दबाव टाकत होता आणि याच मानसिकतेला कंटाळून तिने आत्महत्या केली होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पडळकर यांनी ख्रिश्चन धर्माविरोधान रान उठवलं होतं. ख्रिश्चन पादरीविरोधात वादग्रस्त विधान केलं होतं. तर ज्या पद्धतीने बैलगाडा शर्यतीसाठी बक्षीस असतं तसेच बक्षीस पादरीला ठोकण्यासाठी ठेवलं पाहिजे. पहिल्या पादरीला ठोकेल त्याला पाच लाख, दुसऱ्याला मारेल त्याला चार लाख आणि तिसऱ्याला मारेल त्याला तीन लाखांच आणि जो कुणी पादरीचा सैराट करेल, त्याला अकरा लाखांचे बक्षीस दिले पाहिजे, असे पडळकर यांनी म्हटलं होतं. त्यांच्या याच वक्तव्यामुळे आता ख्रिश्चन समाज आक्रमक झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT