Gopichand Padalkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gopichand Padalkar : पडळकरांचा अजितदादांसह एकनाथ शिंदेंना दे धक्का! स्थानिकसाठी स्वबळाचा निर्धार

Gopichand Padalkar Sangli Politics : रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांची घोषणा झाली आहे. फक्त त्या कधी होणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

Aslam Shanedivan

Sangli Political News : आगामी स्थानिकसाठी राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. विटा नगरपालिकेची निवडणूक देखील होणार आहे. अद्याप यावर महायुतीत कोणतीच चर्चा होताना दिसत नाही. तोच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मोठी घोषणा केली. पडळकर यांनी, विटा नगरपालिकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढविणार अशी घोषणा केली आहे. ते विटा येथे भाजप पदाधिकारी संवाद मेळाव्यात बोलत होते. यामुळे जिल्ह्यात अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. तर स्थानिकला भाजपकडून एकला चलोचा नारा दिल्याने आता शिवसेना राष्ट्रवादी कोणता निर्णय घेतात याकडे उच्छुकांचे लक्ष लागले आहे. यावेळी माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. (BJP MLA Gopichand Padalkar’s declaration to contest the Vita Municipal Council election independently Moreover Ajit Pawar and Eknath Shinde)

खानापूर विधानसभा मतदारसंघात आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका, नगर पंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमिवर महायुतीसह महाविकास आघाडीतील पक्ष आणि स्थानिक आघाड्या आता तयारीला लागले आहेत. महायुती असो किंवा मविआ यांच्यात अद्याप युती आणि जागा वाटपाबाबत फॉर्म्युला ठरलेला नाही. पण त्याआधीच विटा नगरपालिकेवर भाजपचाच झेंडा फडकविणार असा दावा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. तसेच पडळकर यांनी भाजप स्वबळावर विटा नगरपालिका लढविणार असल्याचा निर्धार बोलून दाखवला आहे.

पडळकर म्हणाले, खानापूर तालुक्यात लोक गुलामगिरीच्या जोखडात आहेत. त्यांना मुक्त करायचं आहे. खानापूर पंचायत समितीत 18 ते 20 वर्षे झाले, तेच ते अधिकारी तळ ठोकून आहेत. ते जनतेची नव्हे, तर नेत्यांची सेवा करताना दिसतात. अशांना वठणीवर आणणार.

विकासकामांचे श्रेय कुणीही घ्या, पण काम झालं पाहिजे. 2029 ची निवडणूक अजून लांब आहे. तोपर्यंत बरेच पाणी पुलाखालून जाणार आहे. त्यातून काहीजण अख्खे वाहून जातील. आता जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजपला एकट्याला निवडणूक लढवायची आहे. आपल्याला सगळीकडे उमेदवार चांगले आहेत. जुन्या आणि नव्या लोकांनी एकत्र येऊन काम करा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी पडळकर यांनी माजी आमदार पाटील गटाचे नेते वैभव पाटील यांना टोला देखील लगावला आहे. पडळकर यांनी, आतापर्यंत भाजप घेऊन तुम्ही इकडे तिकडे पळवायचा. पण ते आता चालणार नाही, असा दम भरला आहे. तर विटा पालिका भाजपच्या चिन्हावरच ही निवडणुक तुम्हाला लढवायची असून झेंडाही भाजपचाच फडकवायचा असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT