maharashtra governor bhagatsingh koshyasris meeting Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, मातृभाषा व मातृभूमीचा सन्मान केला पाहिजे...

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील ( Mahatma Phule Agricultural University ) समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांच्या हस्ते ज्येष्ठ नेते शरद पवार ( Sharad Pawar ) व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadakari ) यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान करण्यात आली.

Amit Awari

अहमदनगर : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा आज 35 वा दीक्षांत समारंभ होता. या समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ज्येष्ठ नेते शरद पवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान करण्यात आली. समारंभात कृषी विद्यापीठाचे उपकुलगुरू पी.जी. पाटील यांचे भाषण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मध्येच थांबत त्यांना मराठीतून माहिती देण्याची सूचना केली. कोश्यारींनी त्यांच्या हिंदी भाषणातून मातृभाषांचे महत्त्व कथन केले. Governor Bhagat Singh Koshyari said, mother tongue and motherland should be respected...

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, मराठीतून, मातृभाषेतून बोलावे. आपली मातृभाषा व मातृभूमीचा सन्मान केला पाहिजे. जे लोक आपल्या मातृभाषा व मातृभूमीचा सन्मान करत नाहीत. त्यांचा कोणीही सन्मान करत नाही. इंग्रजीला विरोध नाही पण मातृभाषेत बोला. विद्यापीठांत मराठीतून शिकविता यावे या दृष्टीने काम व्हावे.

कृषीकडे लक्ष देणे आवश्यक

कोश्यारी पुढे म्हणाले, कृषी पिकांचे जिओ टॅगिंग व्हावे. त्यामुळे शेतमालाला विदेशातून चार पट जास्त भाव मिळतो. त्यासाठी चांगले पीक तयार व्हावे व त्याची निर्यात व्हावी. या दृष्टीने काम होणे आवश्यक आहे. लॉकडाऊनमुळे देश बंद असताना देशाची अर्थ व्यवस्था कृषी क्षेत्रानेच चालू ठेवली. त्यामुळे कृषीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. ग्रामगीतेचा अभ्यास करून त्यानुसार आचरण केल्यास ग्रामोध्दार होईल, असेही राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT