Governer Ramesh Bais
Governer Ramesh Bais  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Governer News : राज्यपाल रमेश बैस उद्यापासून महाबळेश्‍वर दौऱ्यावर

Umesh Bambare-Patil

Mahabaleshwar News : राज्यपाल रमेश बैस उद्यापासून (ता. २२) पाच दिवस महाबळेश्‍वर दौऱ्यावर येत आहेत. राजभवन येथील अधिकृत निवासस्थान असलेल्या गिरिदर्शन या बंगल्यामध्ये ते मुक्कामी असतील. या दौऱ्यात ते जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असून श्रीक्षेत्र महाबळेश्‍वर मंदिरासह बेल एअर रुग्णालय तसेच प्रेक्षणीय स्थळांनाही ते भेटी देणार आहेत.

राज्यपाल बैस Governer Ramesh Bais हे मागील आठवड्यात १० मेपासून १७ मेपर्यंत सात दिवसांच्या महाबळेश्‍वर दौऱ्यावर येणार होते. मात्र, त्यांचा हा दौरा पुढे ढकलण्यात आला. आता राज्यपाल यांच्या दौऱ्यामुळे राजभवन Raj Bhavan परिसरात लगबग वाढली असून, स्वागतासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे.

राज्यपाल रमेश बैस यांचे उद्या (सोमवारी) सकाळी अकराच्या सुमारास हेलिकॉप्टरने किसन वीर कॉलेजच्या मैदानावरील हेलिपॅडवर आगमन होईल. तेथून ते बेल एअर हॉस्पिटलला भेट देतील. त्यानंतर साडे अकराच्या दरम्यान पुस्तकाचे गाव भिलारला भेट देतील. त्यानंतर पावणे एकच्या सुमारास ते राजभवन महाबळेश्वरला जातील व तेथे मुक्कामी राहतील.

मंगळवारी (ता.२३) दुपारी दोन वाजता जिल्ह्यातील अधिकऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतील. तर दुपारी चार वाजता सातारा जिल्ह्यातील खासदार व आमदार यांच्यासमवेत बैठक असेल.बुधवारी (ता. २४) दुपारी चार वाजता ते प्रतापगड किल्ल्याला भेट देणार आहेत. साडे सहा वाजता ते परत राजभवना येतील व मुक्कामी राहतील. गुरुवारी (ता. २५) सकाळी पावणे अकराच्या सुमारास हेलिकॉप्टरने मुंबई राजभवनसाठी रवाना होतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT