Prakash Abitkar News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gram Panchayat Election : आमदार आबिटकरांना घरच्या मैदानावर भाजपने गाठले ; सदस्य आले पण सरपंचपदाचा उमेदवार पडला

Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक चर्चेत गारगोटी ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल हाती आला आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक चर्चेत गारगोटी ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. या निकालामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. शिंदे गटाचे आमदार प्रकाश आबिटकर यांचे निवासस्थान असलेल्या गारगोटीत भाजपने धक्का दिला आहे. 17 पैकी 13 सदस्य आबिटकर गटाचे विजयी झाले आहेत. मात्र, सरपंच पदावर विरोधी भाजप (BJP) गटाचा उमेदवार विजयी झाला आहे. शिवाय चार सदस्य विरोधी आघाडीचे निवडून आले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आगामी विधानसभा निवडणुकीत डोळ्यासमोर सर्वच राजकीय नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना बळ दिले होते. त्यामुळे विद्यमान सरपंचांसह आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. आपल्या कार्यकर्त्यांना मोठी मदत केली होती. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या गारगोटी ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र वेगळे चित्र पाहायला मिळाले. शिंदे गटाचे आमदार प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांच्या ग्रामपंचायतीतच पराभवाचा धक्का बसला.

आमदार आबिटकर गट विरोधी भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई गट यांच्यात लढत झाली. अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या लढाईत सरपंच पदावर देसाई गटाच्या प्रकाश वास्कर यांनी विजय मिळवला. तर आमदार आबिटकर गटाचे अरुण शिंदे यांचा पराभव झाला. विशेष म्हणजे गारगोटी ग्रामपंचायत निवडणुकीत 17 पैकी 13 जागांवर आबिटकर गटाचे सदस्य निवडून आले आहेत. तर उर्वरित 4 सदस्य देसाई गटाचे विजयी झालेत.

एक वोट एक नोट ठरला प्रभावी फॅक्टर

दरम्यान, देसाई गटाचे उमेदवार प्रकाश वास्कर यांनी प्रचारात आघाडी मिळवली होती. निवडणुकीत होणारा पैशाचा वापर टाळण्यासाठी त्यांनीच 'एक वोट एक नोट' हा उपक्रम राबविला. त्याला नागरिकांनाही उदंड प्रतिसाद दिला. हाच फॅक्टर त्याना या निवडणुकीत भारी पडला.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT