Hasan Mushrif On Keshavrao Bhosle Theatre Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Hasan Mushrif : आगीच्या भक्षस्थानी पडलेले केशवराव भोसले नाट्यगृह पाहून पालकमंत्री मुश्रीफ भावुक; म्हणाले, पुन्हा...

Jagdish Patil

Kolhapur News, 09 August : कोल्हापुरातील ऐतिहासिक संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागल्यामुळे संपूर्ण नाट्यगृह जळून खाक झालं आहे. ही घटना कलाप्रेमींसाठी अत्यंत दुःखद आहे.

या घटनेवर आता पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif ) यांनी देखील दु:ख व्यक्त केलं आहे. शिवाय हे नाट्यगृह पुन्हा मोठ्या ताकदीने उभारण्यासाठी प्रयत्न करू, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.

आगीच्या भक्षस्थानी सापडलेले संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह (Keshavrao Bhosle Theatre) हे कोल्हापूरच्या सांस्कृतिक चळवळीचा फार मोठा ठेवा आहे. राजर्षी शाहू महाराज यांनी रोम या देशात गेल्यानंतर तिथले नाट्यगृह पाहून इथल्या स्थानिक नाट्य रसिकांसाठी ते बांधले होते. हे नाट्यगृह आगीत जळून भस्मसात होणे ही हृदयाला चटका लावणारी गोष्ट आहे, अशा शब्दात मंत्री मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

तसंच या घटनेची माहिती रात्री उशीरा समजली सोशल मीडियावर व्हायरल झालेली आगीची दृश्य मनाला अत्यंत अस्वस्थ करणारी होती. दोन दिवसांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर (Kolhapur) दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी या दुर्घटनेबद्दल त्यांच्याशी चर्चा करून या नाट्यगृहाच्या नवीन उभारणीसाठी जास्तीत जास्त निधीसाठी प्रयत्नशील राहू आणि हे वैभव पुन्हा मोठ्या ताकदीने उभारण्यासाठी प्रयत्न करू.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी निर्माण केलेले हे सांस्कृतिक वैभव पुन्हा उभे करणे किंबहुना, याच्यापेक्षा अधिक चांगले करणे ही आम्हा सर्व लोकप्रतिनिधींची, सरकारची आणि समाजाची जबाबदारी आहे, असं मुश्रीफ म्हणाले.

नाट्यगृह म्हणजे सांस्कृतिक वैभवच

संगीतसूर्य केशवराव भोसले हे नाट्यगृह सन 1992 मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी हे पॅलेस थिएटर उभारले होते. गुरुवारी रात्री उशिरा नाट्यगृहाला भीषण आग लागली आणि या आगीत नाट्यगृह जळून बेचिराराख झाले. मुंबईवरून येणाऱ्या पालकमंत्र्यांनी कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर येताच थेट नाट्यगृहाला भेट देत पाहणी केली. पालकमंत्र्यांनी शुक्रवारी सकाळी भेट दिली. यावेळी नाट्यगृहाची झालेली भग्न अवस्था पाहून ते भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT