Satara, 26 january : प्रजासत्ताक दिनानिमित्त आज बुलडाणा जिल्ह्यात ध्वजवंदनाचा कार्यक्रमाचा पार पाडला. मात्र, जिल्ह्याला पालकमंत्र्यांसह चार चार मंत्री लाभूनही ध्वजवंदन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करावे लागले, त्यामुळे बुलडाण्यातील नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, याबाबत बुलडाण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी जाहीरपणे बुलडाणा जिल्ह्यातील नागरिकांची माफी मागितली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील (Makarand Patil) यांच्याकडे बुलडाण्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यांच्या मदतीला सहपालकमंत्री म्हणून भाजपचे मंत्री संजय सावकारे यांच्या नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, आकाश फुंडकर हे दोन मंत्रीही जिल्ह्याला लाभले आहेत.
पालकमंत्री पाटील, सहपालकमंत्री सावकारे यांच्यासह बुलडाणा जिल्ह्याला चार मंत्री लाभले आहेत. मात्र, आज प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पाडावा लागला आहे. प्रतापराव जाधव आणि फुंडकर हे जिल्ह्यात उपस्थित असूनही ते शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमाकडे फिरकले नाहीत, त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री, सहपालकमंत्री उपस्थित राहिले नव्हते, त्यावेळीही शेतकऱ्यांमधून तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली होती. पालकमंत्री अनेकादा जिल्ह्यात फिरकत नाहीत, अशी तक्रार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जाहीरपणे करण्यात आली होती. त्यातच आजच्या शासकीय ध्वजवंदनाच्या कार्यक्रमाला पालकमंत्री उपस्थित न राहिल्याने त्यात आणखीच भर पडली आहे.
याबाबत पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी बुलडाणा जिल्ह्यातील नागरिकांची जाहीरपणे माफी मागितली आहे. ते म्हणाले, माझी तब्येत कालपासून (रविवार, ता. २५ जानेवारी) बरी नव्हती. बुलडाण्याला ध्वजवंदनासाठी जाण्याचे माझे खूप प्रयत्न होते. पण तब्येत बरी नसल्यामुळे मी बुलाडाण्याला जाऊ शकलो नाही.
माझी तब्येत गेली दोन दिवसांपासून बरी नसल्यामुळे मला बुलडाण्याला ध्वजवंदनाच्या कार्यक्रमाला जाता आले नाही. त्याबद्दल बुलाडाणा जिल्ह्यातील समस्त नागरिकांची मी मनापासून माफी मागतो, असे स्पष्टीकरण देऊन मकरंद पाटील यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.