Gunratna Sadavarte Latest News Updates
Gunratna Sadavarte Latest News Updates 
पश्चिम महाराष्ट्र

आज ठरणार सदावर्तेंचा पुढचा मुक्काम?

सरकारनामा ब्युरो

सातारा: खासदार उदयनराजे भोसले (Udayanaje Bhosle) व छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल सातारा सत्र न्यायालयाने अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना चार दिवसांची म्हणजेच १८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. ही कोठडी आज संपत आहे. सातारा पोलीस आज गुणरत्न सदावर्तेना न्यायालयात हजर करणार आहेत. त्यामुळे आज त्यांच्या कोठडीत वाढ होते की त्यांना दिलासा मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Gunratna Sadavarte Latest News Updates)

दीड वर्षांपूर्वी खासदार उदयनराजे भोसले व खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या गुन्ह्यात सदावर्ते यांना सातारा शहर पोलिसांनी अटक केली. १६ एप्रिल रोजी त्यांना सातारा न्यायालयाने १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. पाठोपाठ बीडमध्येही गुन्हा नोंद झाल्याने गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत भर पडली आहे. त्यामुळे साताऱ्यानंतर सदावर्तेंचा मुक्काम कुठे असेल, हे न्यायालयाच्या निर्णयावरुन कळणार आहे.

मराठा आरक्षणाविषयी तसेच समाजबांधवांच्या मोर्चाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने सदावर्ते यांच्यावर रविवारी (ता. १७) येथील शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. भाजपचे बीड (Beed) तालुकाध्यक्ष ॲड.स्वप्नील गलधर यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.तर गुणरत्न सदावर्तेंच्या तोंडाला काळे फासणाऱ्याला ५० हजार रुपये बक्षीस देण्याची घोषणाही गलधर यांनी केली होती. त्यामुळे सदावर्तेंच्या अडचणीत वाढ होण्याचीही शक्यता आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी खासदार शरद पवार यांच्या बंगल्याबाहेर हिंसक आंदोलन झाले. आंदोलकांनी शरद पवार यांच्या घराबाहेर दगडफेक आणि चप्प्लफेक केली. आंदोलकांना याप्रकरणी एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्तेंना अटक झाली होती. त्यानंतर सदावर्ते यांचा सातारा पोलिसांनी ताबा घेतला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT