Kolhapur News : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सातत्याने सांगितले आहे. या प्रकरणांमध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करू. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपी अटक झाले आहेत. केवळ एक आरोपी अटक करायचा राहिला आहे. पण धनजंय देशमुख यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्याविषयी त्यांची जी मागणी आहे. त्याला कोणताच पुरावा नाही. पुरावा जर असेल तर आम्ही सोडणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आधीच स्पष्ट केले आहे.
त्यामुळे आता हे वातावरण शांत राहण्याची गरज आहे, अशा शब्दांत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी देशमुख यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली. ते कोल्हापुरात बोलत होते. शक्तीपीठ महामार्गावरून बोलताना, कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तिपीठ महामार्ग जाणार नाही. सांगलीपर्यंत कुणाचाही विरोध नाही. त्यामुळे तिथे विरोध करायचा आमचा संबंध नाही. शक्तिपीठ महामार्गाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी माझी चर्चा झाली आहे.
सांगलीच्या पुढे संकेश्वर मार्गे गोव्याला शक्तिपीठ महामार्ग होऊ शकतो, असे मी सुचवले आहे. शक्तिपीठ महामार्ग होणार, मात्र कोल्हापूर जिल्हा त्यामध्ये नसेल. आडमार्गाने देखील शक्तिपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यात येणार नाही. सांगलीपर्यंत त्यांना शक्तीपीठ महामार्ग हवा असेल तर त्यांना अडवणारे आपण कोण? अशी स्पष्टीकरण मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी दिले.
लाडकी बहीण योजनेबद्दल आमचे मत असं होतं की एखाद्या टाटा बिर्ला, अदानी यांच्या घरातील महिलांनी अर्ज भरला तर त्यांना कसे पैसे देता येईल. चार चाकी गाडी वगैरे किंवा इन्कम टॅक्स भरत असतील तर त्यांना पैसे कसे देता येईल, हे आमच्या जीआरमध्येच आहे. लाडकी बहीण योजनेमधून त्यांचं नाव जरी कमी झालं तरी त्यांच्याकडून आधीची वसुली करणार नाही. असेही मुश्रीफ यांनी सांगितले. 26 जानेवारी पूर्वी पालकमंत्री पदाचा निर्णय होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.