hasan mushrif |samarjitsinh ghatge  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Hasan Mushrif : हसन मुश्रीफांची जीभ घसरली, समरजितसिंह घाटगेंबद्दल आक्षेपार्ह विधान

Hasan Mushrif : विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत, तसं टीका-टिप्पणी वाढल्या आहेत. मात्र, मुश्रीफांनी घाटगेंविरोधात आक्षेपार्ह विधान केलं आहे.

Rahul Gadkar

कागल विधानसभा मतदारसंघातील लक्षवेधी लढतीचा प्रचार आता मुंबईपर्यंत पोहोचला आहे. रविवारी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा मुंबईत, तर महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी पुणे येथे मेळावा घेतला. पुण्यात घाटगेंच्या मेळाव्याबाबत बोलताना मुश्रीफांची पातळी घरसली आहे.

"सुप्रियाताई सुळे यांनी ह*******र प्रवृत्तीच्या कार्यक्रमाला जायला नको होते. ईडीचे प्रकरण कुणामुळे सुरू झाले, याची माहिती सुप्रियाताई सुळे यांनी घ्यायला हवी होती," असं विधान हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif ) यांनी केलं आहे.

"मी प्रत्येक विधानसभा निवडणुकीत मेळावा घेतो. मुंबईत रविवारी झालेल्या मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला. माझ्या मतदारसंघातील 20 हजार नागरिक मुंबईत राहतात. तीन हजार लोकांचं नियोजन केलं होतं. पण, 5 ते 6 हजार नागरिक आले होते. मुंबईत राहणाऱ्या माझ्या भागातील नागरिकांनी मतदारसंघातील काम बघितलं आहे," असं मुश्रीफांनी सांगितलं.

शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार भास्कर जाधव यांचा मुलगा विक्रांत जाधव यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली होती. याबद्दल प्रश्न विचारल्यार मुश्रीफ म्हणाले, "कुणाचा मुलगा किंवा मुलगी विरोधात उभे राहिल हे कळेल. पण, पाच वर्षे वाट पाहणं हे सोपं काम नाही. त्यामुळे नेत्यांच्या भेटीगाठी सुरू आहे. निवडणुकीत उमेदवारांच्या मांडवली होणार आहेत, हे मी पूर्वीच बोललो आहे."

"पुढील आठवड्यात केंद्रीय मंत्री अमित शहा कोल्हापुरात येत आहेत. शहा यांच्या हस्ते जिल्हा बँकेच्या इमारतीचे आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन करणार होतो. मात्र, पितृपंधरवडा असल्यानं हा कार्यक्रम पुढे ढकलला आहे," असं मुश्रीफ यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT