Bhaiya Mane Hasan Mushrif sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

MLC Election : मंत्री हसन मुश्रीफांनी वाढवले भाजपचे टेन्शन, पदवीधरसाठी राष्ट्रवादीकडून भैय्यासाहेब माने उमेदवार?

Bhaiya Mane Hasan Mushrif : हसन मुश्रीफ हे प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने यांच्या उमेदवारासाठी आग्रही आहेत. अरुण लाड यांच्या उल्लेख करत यावेळी भैय्यासाहेबांना संधी मिळाली पाहिजे असे ते म्हणाले.

Roshan More

Hasan Mushrif News : शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे. 6 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचे सुत्र निश्चित असताना महायुतीमध्ये अजून उमेदवारी कोणाला हे निश्चित झाले नाही. भाजप आणि सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक उमेदवारांची संख्या सर्वाधिका आहे. त्यातच मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रताप माने उर्फ भैय्यासाहेब हे उमेदवार असतील असे संकेत दिले आहे.

मुश्रीफ म्हणाले, 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गेल्या वेळी ही जागा लढवली होती. राष्ट्रवादीचे अरुणअण्णा लाड हे विधान परिषदेचे आमदार म्हणून निवडून आले होते . त्यावेळेस त्यांनी भैय्यासाहेब मानेंना शब्द दिला होता की, पुढची निवडणूक तुम्ही लढवा यावेळी माघार घ्या. त्याप्रमाणे आपण त्यांची उमेदवारी मागे घेतली होती.'

पुढे बोलताना ते म्हणाले, 'आता अरुण लाड यांचे चिरंजीव शरद लाड हे भाजपमध्ये प्रवेश करून निवडणुकीसाठी तयार झाले आहेत. पण मागील तीन चार विधान परिषदेच्या निवडणुकीत भैय्यासाहेबांनी काम केलं आहे. ते अनेक वर्ष शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य राहिले आहेत. अनेक शैक्षणिक संस्थांचा त्यांचा संबंध आला आहे. पाचही जिल्ह्यात त्यांचा संपर्क आहे.'

'भैय्यासाहेब माने माझ्या घरी आलो होते. त्यांनी सांगितले की, मला तिकीट नाही मिळालं तरी मला निवडणूक लढवावी लागणार आहे. कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव माझ्यावर आहे. या निवडणूकची तयारीला त्याने बैठक घेऊन सुरुवात केली आहे. आपल्या नियोजन करावे लागले.शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीची बैठक होईल. तेव्हा आम्ही जागा सोडवून घेण्याचा प्रयत्न करू.', असे देखील त्यांनी सांगितले.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून कोण?

महाविकास आघाडीत पुणे पदवीधर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे असणार आहे. येथून माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या कन्या हर्षदा जाधव-देशमुख यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. सध्या देशमुख हे रयत शिक्षण संस्थेवर कार्यरत आहेत.तर, 'रयत'चे नेतृत्व ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार करत आहेत. 'रयत'चे राज्यभर पसरलेल्या शिक्षण संस्थांचे जाळे हे या उमेदवारी देण्यामागचे मुख्य कारण समजले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT