Hasan Mushrif
Hasan Mushrif sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

''बाहेर पडला की पाऊस अन् टीव्ही लावला की राऊत'' मुश्रीफांची टोलेबाजी

सरकारनामा ब्युरो

सांगली : इस्लामपूर येथील पंचायत समितीतील लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळयाचे अनावरण ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या हस्ते रविवारी झाले. यावेळी मुश्रीफांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्याच्या आठवणींनी उजाळा दिला. मुश्रीफांनी यावेळी सादर केलेल्या चारोळीमुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला.

यावेळी व्यासपीठावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर उपस्थित होत्या. '2019 च्या विधानसभा निवडणुकानंतर आम्ही सत्तेत कसे आलो,'' यांचा किस्सा मुश्रीफांनी सांगितला.

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले तेव्हा अनेक घडामोडी झाल्यात. या सरकार स्थापनेत शिवसेनचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठी भूमिका बजावली. त्या घटनेचे वर्णन करताना मुश्रीफ म्हणाले, ''बाहेर पडला की पाऊस अन् टी व्ही लावला की संजय राऊत!''

पश्चिम महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक समाजाचे नेते आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निष्ठावंत अशी मुश्रीफ यांची ओळख आहे. गेल्या 40 वर्षांहून अधिक काळ ते कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. महाविकास आघाडी सरकारच्याही काळात मंत्रीपदी वर्णी लागलेले मुश्रीफ यांनी विकासकामांच्या जोरावर जिल्ह्यात दबदबा कायम ठेवला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT