hasan mushrif-satej patil
hasan mushrif-satej patil 

Sarkarnama

पश्चिम महाराष्ट्र

हसन मुश्रीफ-सतेज पाटील यांचा सेनेला झटका! : भाजपला जवळ केले...

सुनील पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हातील अनेक निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवल्या पण, जिल्हा बॅंकेत मात्र, कॉंग्रेस-राष्ट्रवादीने (Congress & NCP) शिवसेनेला (Shivsena) डावलुन भाजपला (BJP) सोबत घेतले हे दुदैवी आहे. सत्तारूढ पक्षांकडून सोयीचे राजकारण केले जात असून शिवसेनेचा केवळ वापर करुन घेतला जात आहे. भाजपला सोबत घेतल्यामुळे महाविकास आघाडी राहिली नाही यामुळे सर्व समविचारी पक्ष हे एकत्र येवून सत्तारूढ गटाला टक्कर देण्याचा निर्णय घेतला असल्याचा इशारा शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, (Arun Dudhwadkar) खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) व माजी आमदार चंद्रदीप नरके (Chandradeep Narke) यांनी आज (ता.21 डिसेंबर) दिला. त्यांनी शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठक़ीनंतर माध्यमांशी संवाद साधला.

दुधवडकर म्हणाले, जिल्हा बॅंकेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवली जाईल, यासाठी आम्ही ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटीलांना आज दुपारपर्यंत वेळ दिली होती. मात्र, तरीही त्यांना आमचा प्रस्ताव मान्य नाही. त्यांनी भाजपसोबत युती केली आणि शिवसेनेला डावलले आहे. त्यामुळे शिवसेना म्हणून आम्ही सर्व समविचारी पक्ष जिल्हा बॅंकेची निवडणूक ताकदीने लढवणार असणार असल्याचे स्पष्ट केले.  

यावेळी मंडलिक म्हणाले, जिल्हा बॅंकेत माझ्यासोबत बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर हे प्रक्रिया गटातून जिल्हा बॅंकेत संचालक होतो. पी.जी. शिंदे यांनी जिल्हा बॅंकेचा अनेकवर्ष कारभार केला आहे. शिवसेना प्रणित पॅनेलमध्ये सहकारी सर्व दिग्गिज उमेदवार आहेत. पक्षाच्या पलिकडे जावून वेगवेगळ्या लोकांना उमेदवार म्हणून घेतले आहे. बॅंक चांगली चालावी यामध्ये शिवसेनेचा अधिक भाग असावा, अशीच मागणी होती. त्यांची मागणी मान्य झाली असती तर, पॅनेल झाले नसते. महाविकास आघाडी म्हणून आपण अनेक निवडणूका लढलो आहोत. जिल्हा बॅंकेतही महाविकास आघाडी असावी. मात्र, दुदैवाने कॉंग्रेस-राष्ट्रवादीने भारतीय जनता पक्षाला सोबत घेतल्याने. महाविकास आघाडी राहिली नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.

शिवसेनेच्यानिमित्ताने जिल्ह्यातील चांगले संघटन आणि चांगल्या विचारांना ताकद देणारी माणसं मिळत असतील तर, त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय झाला आहे. माणसं किती दिली यापेक्षा बॅंकेच्या कारभार भविष्यात कसा चालणार याचा विचार केला जाईल. सर्वसामान्य माणसांकडे बॅंक राखली पाहिजे. ज्याच्या घरात आर्थिक पाठबळ मिळत नाही. त्यांना बळ देण्याचे काम केले पाहिजे, असे माजी आमदार संपतराव पवार-पाटील म्हणाले.

तर नरके म्हणाले, जिल्हा बेँकेच्या निवडणुकांनिमित्त कोल्हापूरात झालेल्या सर्व घडमोडींची माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना सांगितल्या आहेत. जिल्ह्याच्या राजकारणात आणि संस्थांमध्ये सोयीचे राजकारण केले जात आहे. आवश्‍यक ठिकाणी शिवसेनेचा वापर करुन घ्यायचा, एकमेंकांना लढवायचे आणि पुढच्या निवडणूकीत आपला शब्द बदलायचा. या भूमिका सातत्याने केल्या जात आहेत. याला छेद देण्यासाठी जिल्हा बॅंकेत सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडूण देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला, असे नरकेंनी सांगितले. तर, शहाजी कांबळेंनी सर्वसामान्य नागरिकांना बॅंकेच्या सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत, यासाठी आरपीआयच्यावतीने उमेदवार शाहू पॅनेलमध्ये उतरवला असल्याचे सांगितले. या निवडणुकीच्या निमित्ताने मुश्रीफ, सतेज पाटलां बरोबरच राजू शेट्टींनी सुद्धा सेनेला डावलले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT