Hasan Mushrif Vs Samarjit Singh Ghatge Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Hasan Mushrif : 'दुसऱ्यांचं वाईट चिंतणाऱ्यांचं वाईटच होतं', मुश्रीफांनी घाटगेंना डिवचलं, नेमकं काय म्हणाले?

Hasan Mushrif on Samarjit Singh Ghatge political debate : अत्यंत अटीतटीच्या आणि लक्षवेधी ठरलेल्या लढतीत मुश्रीफ यांनी आपला गड राखत कोल्हापूरच्या राजकारणात आपले महत्त्व पटवून दिले. तर आव्हान दिलेल्या घाटगे यांना विजयानंतर आता पुन्हा एकदा आव्हान दिले आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News : राज्यात लक्षवेधी ठरलेल्या कागल विधानसभा मतदारसंघातून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सलग सहाव्यांदा बाजी मारत कागलचा वस्ताद आपणच असल्याचे सिद्ध केले. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांच्या विरुद्ध झालेल्या निवडणुकीत मुश्रीफ विजयी होऊन पुन्हा मंत्री झाले. अत्यंत अटीतटीच्या आणि लक्षवेधी ठरलेल्या लढतीत मुश्रीफ यांनी आपला गड राखत कोल्हापूरच्या राजकारणात आपले महत्त्व पटवून दिले.

तर आव्हान दिलेल्या घाटगे यांना विजयानंतर आता पुन्हा एकदा आव्हान दिले आहे. निवडणुकीपूर्वी घाटगे हे भाजपमध्ये होते. तर मुश्रीफ राष्ट्रवादीत होते. राष्ट्रवादी महायुतीत (NCP) सामील झाल्यानंतर उमेदवारीची गोची निर्माण झाल्याने घाटगे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता.

वैद्यकीय शिक्षण मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल गडहिंग्लज येथे राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिंदे शिवसेना व रिपाई यांच्यावतीने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन (Hasan Mushrif) यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. या सोहळ्यात बोलताना त्यांनी घाटगे यांना टोले लगावले आहेत. मला आणि माझ्या कुटुंबियांना तुरुंगात टाकून एकाने आमदारकीचे स्वप्न पाहिले होते.

मात्र त्यांना परमेश्वरानेच अद्दल घडवली. दुसऱ्यांचे वाईट चिंतणाऱ्यांचे वाईट होते. चांगल्या माणसाला कधीही चांगलेच फळ मिळते, याचे उदाहरण या निवडणुकीने दाखवून दिले आहे. अशा शब्दात हसन मुश्रीफ यांनी घाटगे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

ते ज्या पक्षात होते, त्याच पक्षासोबत आज मी मंत्री आहे. मात्र, त्यावेळी मी जेथे होतो, त्या पक्षात ते आज आहेत. नियत व दानत साफ असलेल्या माणसाचा पराभव कधीच होऊ शकत नाही. असा मुश्रीफ यांनी टोला लगावत नियत आणि दानत माझ्याकडे असल्याने मला परमेश्वराने आशीर्वाद दिले, असेही मुश्रीफ म्हणाले आहेत.

31 मार्चपूर्वी निवडणुका, मुश्रीफ यांचा दावा

महायुतीच्या सत्कार समारंभात बोलत असताना मुश्रीफ यांनी 31 मार्चपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार असल्याचे संकेतही दिले आहेत. गडहिंग्लज पालिकेवर राष्ट्रवादीसह महायुतीचा झेंडा फडकविण्यासाठी सर्वांनी आतापासूनच जोमाने काम करावे. असेही मुश्रीफ म्हणाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT