Hasan Mushrif Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Hasan Mushrif : गोकुळच्या रिंगणातून हसन मुश्रीफ यांची माघार; निवडणुकीपूर्वीच केली मोठी घोषणा!

Hasan Mushrif Gokul election latest news : गोकुळ निवडणुकीपूर्वी हसन मुश्रीफ यांनी रिंगणातून माघार घेत मोठी घोषणा केली. या निर्णयामागील कारणे, राजकीय घडामोडी आणि ताजे अपडेट्स वाचा.

Rahul Gadkar

गेल्या चार महिन्यापासून सुरु असलेल्या गोकुळ दूध संघाच्या राजकारणावरून महायुतीमधील घटक पक्षात सुरू असलेल्या स्पर्धेतून अनेकांनी नाराजी व्यक्त केली. या निवडणुकीत उतरण्यासाठी अनेकांनी शड्डू ठोकले असताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी या निवडणुकीतून माघार घेतली.

मी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी उभा राहणार नाही, अशी स्पष्टोक्ती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी येथे दिली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जनसेवा सप्ताह अंतर्गत झालेल्या कागल विधानसभा मतदारसंघातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना किट वाटप, शिष्यवृत्ती मंजुरी पत्रे वाटप, घरकुल पत्रे वाटप या संयुक्त कार्यक्रमात मंत्री मुश्रीफ बोलत होते.

वैद्यकीय शिक्षण मंत्री असं मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक असून गेल्या दहा वर्षांपासून ते बँकेचे अध्यक्ष आहेत. रिझर्व बँकेच्या नियमानुसार दहा वर्ष संचालक असणाऱ्यांना या निवडणुकीत संचालक होता येणार नाही. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत स्वतः असणार अशी चर्चा सध्या कोल्हापूर जिल्ह्यात सुरू होते. यापूर्वी त्यांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ हे गोकुळचे अध्यक्ष होते. शिवाय त्यांनी अन्य तीन कार्यकर्त्यांना संधी दिली होती.

राज्यातील राजकारणासह जिल्ह्यातील एका मोठ्या सहकारी संस्थेचे संचालक असणे सध्या जिल्ह्याच्या राजकारणासाठी महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील खासदार आणि आमदार हे जिल्हा बँकेचे संचालक आहेत. मात्र मुश्रीफ यांनी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मी स्वतः नाही असे स्पष्टीकरण दिले. मात्र स्वतः मंत्री मुश्रीफ नसतील तर त्यांच्या घरातीलच एखादा उमेदवार किंवा कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे हे मात्र स्पष्ट झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT