Hasan Mushrif  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Hasan Mushrif : हसन मुश्रीफांचा मोठा दावा: २० जानेवारीच्या आतच मिळणार मराठा आरक्षण?

Sachin Waghmare

kolahapur News : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून गेल्या काही दिवसांपासून मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांनी आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या विरोधात रान पेटवले आहे. त्यामुळे सरकारसमोरील अडचणही वाढल्या आहेत. त्यातच आता मनोज जरांगे पाटलांनी २० जानेवारीपासून मुंबईकडे कूच करीत आझाद मैदानावर आंदोलन करण्याची तयारी सुरु केली आहे.

मनोज जरांगे यांना 20 तारखेला मुंबईत यायची गरज पडणार नाही. त्यापूर्वीच राज्य सरकारकडून आरक्षण दिले जाणार असल्याचे मीडियाशी बोलताना कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

सामाजीक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damaniya) यांनी अजित पवार गटाकडे राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना गाड्या वाटण्याइतपत पैसे कुठून आणले, असा सवाल पत्रकारांनी उपस्थित केला असता मुश्रीफ यांनी यावर आमचे नेते सुनील तटकरेच हिशोब देतील, असे सांगत या प्रश्नाला बगल दिली.

कोल्हापूरातील 100 कोटी रुपयांच्या विविध कामाचे उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व्हावे, अशी शिंदे गटाची इच्छा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वेळ मिळायला उशीर होणार आहे. त्यामुळे उदघाटनापेक्षा नागरीकांच्या सोयीसाठी कामाला सुरुवात करूयात अशी विनंती मी शिंदे गटाला करणार असल्याचे यावेळी मुश्रीफ यांनी सांगितले.

शिंदे गटाबद्दल काही माहिती नाही

शिंदे गट भाजपमध्ये विलीन होईल का ? असा प्रश्न पत्रकारांनी हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना विचारला असता याबाबत आपल्याला काहीही माहिती नाही, असे सांगून त्यांनी या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले. त्याशिवाय कोल्हापूर शहरातील रखडलेल्या विकास कामावरून विविध प्रश्न विचारण्यात आले.

SCROLL FOR NEXT