Hasan Mushrif Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Hasan Mushrif : अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षानेच टोचले मंत्री मुश्रीफांचे कान; म्हणाले, "आतातरी कागल सोडून..."

NCP Kolhapur politics : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुश्रीफ यांच्यावर सातत्याने राष्ट्रवादी हा कागल मतदारसंघा पुरताच मर्यादित ठेवल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून केला जात आहे.

Sudesh Mitkar

Kolhapur News, 03 Mar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुश्रीफ यांच्यावर सातत्याने राष्ट्रवादी हा कागल मतदारसंघा पुरताच मर्यादित ठेवल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून केला जात आहे.

अशातच नुकत्याच पार पडलेल्या महायुतीमधील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात अप्रत्यक्षपणे त्याचा प्रत्यय आला. राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनीच भर स्टेजवर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांचे विनंती वजा कान टोचण्याची वेळ आली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी बोलताना, पक्ष वाढीला आता चांगली संधी आहे.

त्यामुळे कागल सोडून आता जिल्ह्याकडेदेखील आपण बघावे. महिन्यातून एक दिवस आम्हा कार्यकर्त्यांसाठी द्या. माजी आमदार राजेश पाटील यांना राज्यात मानाचे स्थान द्या, अशी म्हणायची वेळ पाटील यांच्यावर आली. वैद्यकीय शिक्षण व त्यांची जबाबदारी मिळाल्याने तर पक्षाच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.

वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची सहाव्यांदा आमदार आणि नवव्यांदा मंत्रि‍पदी निवड झाल्याबद्दल ‘राष्ट्रवादी’चे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, शहराध्यक्ष आदिल फरास यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मार्केट यार्डमधील राष्ट्रवादी भवनातील हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी सत्कार समारंभाच्या भाषणात बोलताना मुश्रीफांनी कार्यकर्त्यांवर आश्वासनांची बरसात केली. राष्ट्रवादीकडून जिल्ह्यात सदस्य नोंदणीला प्रारंभ झाला आहे. याचेनिमित्त साधन मुश्रीफ यांनी, राज्यात पाचशे महामंडळांची सदस्य संख्या ४८०० इतकी आहे. ४० स्थानिक समित्या आहेत. सदस्य नोंदणीच्या निमित्ताने पक्षाला तळागाळापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे.

पक्षाचा जो कार्यकर्ता सर्वात जास्त सदस्य नोंदणी करील, त्याला जिल्ह्याच्या वाटणीला येणाऱ्या महामंडळाचे अध्यक्षपद दिले जाईल. तालुका आणि मतदारसंघात जो सदस्य नोंदणीची संख्या जास्त करेल, त्याला समित्यांवरील संचालकपद दिले जाईल. अशी आश्वासनांची खैरात वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी यावेळी केल्याचं पाहायला मिळालं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT