Prakash Abitkar 2 (1).jpg Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur News : 'सलमान'च्या तेलाविरोधात आरोग्यमंत्र्यांचा 'रामबाण' उपाय; राज्यात निघणार परिपत्रक, अधिकारी ठरणार जबाबदार

Health Minister Prakash Abitkar : राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर केवळ इतक्यावरच न थांबता राज्यात कुठेही असे प्रकार घडत असल्यास, आणि त्या संदर्भातील माहिती अधिकाऱ्यांना नसल्यास त्या अधिकाऱ्यांना देखील जबाबदार धरण्यात येणार आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News : कोणतीही अधिकृत परवाना नसताना आणि आरोग्य यंत्रणेची कोणतीच परवानगी नसताना कोल्हापुरातील बागेत टक्कल ग्रस्त लोकांच्या डोक्याला तेल चोळणारा विरोधात राज्याचा आरोग्य विभागाने रामबाण उपाय शोधला आहे. राज्यात कोणीही अशा प्रकारचे तेल विकत असल्यास त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी मोठ्या कारवाईचे आदेश दिले आहेत.

यासंबंधीची माहिती जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना नसल्यास त्यांनाही जबाबदार धरण्यात येणार आहे. त्याबाबतच्या सूचना राज्यातील आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. लवकरच त्याबाबतचे परिपत्रक जाहीर करण्यात येईल अशी माहिती आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सरकारनामाशी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर (Kolhapur) शहरातील विविध महापालिकेच्या बागेत तेल लावा डोक्यावर केस येथील असा दावा करत मोफत औषध वाटण्याचा प्रकार सुरू केला होता. सोशल मीडियाद्वारे सलमान उर्फ मोहम्मद सोहेल याने जडीबुटी तेल असल्याचा दावा करत टक्कल ग्रस्त लोकांच्या डोक्याला तेल लावण्याचा प्रकार सुरू केला होता. त्याच्या या आवाहनाला प्रतिसाद देत पीडित लोकांची गर्दी उसळली होती.

मात्र, या तेलाबाबत आणि उद्योगाबाबत कोणतीच परवानगी नसल्याचे समोर आल्यानंतर तेल लावणाऱ्याने प्रशासनाच्या हातावर तुरी देऊन पलायन केले होते. कोल्हापूर महापालिका आणि सार्वजनिक आरोग्य विभागाकडून या तेल विक्रेत्यावर कारवाई केली जाणार आहे.

वास्तविक, पाहता असेच तेल विक्री करायचे झाल्यास त्याला त्याला आरोग्य प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. शिवाय ज्या क्षेत्रात हा व्यवसाय करायचा आहे. त्या परिसरातील आरोग्य विभागाची परवानगी असणे आवश्यक आहे. मात्र, कोणतीच परवानगी नसल्याचे उघड झाल्याने अशा व्यक्तीवर कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले होते. कोल्हापूरचे पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी देखील या प्रकाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर केवळ इतक्यावरच न थांबता राज्यात कुठेही असे प्रकार घडत असल्यास, आणि त्या संदर्भातील माहिती अधिकाऱ्यांना नसल्यास त्या अधिकाऱ्यांना देखील जबाबदार धरण्यात येणार आहे. अशा व्यक्तींवर आणि त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा आबिटकर यांनी दिला आहे. येत्या दोन दिवसांत त्याबाबतचे परिपत्रक जारी करणार असल्याचे देखील आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT