Tanaji Sawant
Tanaji Sawant Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

‘हाफकिन’वरून प्रश्न विचारताच आरोग्यमंत्री भडकले; ‘मी तुम्हाला अंगठेबहाद्दर मंत्री वाटतो का?’

विश्वभूषण लिमये

सोलापूर : पुण्यातील (Pune) ससून रुग्ण्यालयात ‘हाफकीन’ (Hafkin) या व्यक्तीकडून औषधं घेणं बंद करा, असं विधान करत आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी आपल्या अपुऱ्या ज्ञानाच प्रदर्शन केलं होत. मात्र, त्यावर त्यांना सोलापुरात (Solapur) प्रश्न विचारला असता आरोग्य मंत्री सावंत हे माध्यमांवर भडकल्याचं चित्र पाहायला मिळालं. मी इंजिनियर आहे आणि डिप्लोमा, डिग्री, पीजी, पीएच.डी. मिरीटमध्ये केलंय.‘हाफकीन’ माणसाकडून औषध घेऊ नका, असं मी बोललो असेन तर मी आत्ताच राजीनामा देतो, असे आव्हान आरोग्य मंत्री सावंत यांनी दिले. (Health Minister Tanaji Sawant got angry as soon as he asked a question about Hafkin)

‘माध्यमांना हे सरकार आलेलं रुचत नाहीये. मी इंजिनियर आहे आणि डिप्लोमा, डिग्री, पीजी, पीएच.डी. मिरीटमध्ये केलंय.‘हाफकीन’ या व्यक्तीकडून औषधं घेणं बंद करा, असं मी बोललोच नाही. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला मार्गदर्शन केलं आणि त्यामध्ये ‘हाफकिन’ या औषध कंपनीचं डिसेंट्रलायझेशन होणं गरजेचं आहे. यामध्ये नवीन औषधीय संस्था येणं गरजेचं आहे, असे त्यावेळी सूचविण्यात आले. त्यानुसार मी तसा आदेश दिला, असे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी स्पष्ट केले.

एकदा माझ्या नेटवर जाऊन बघा, मी किती शिक्षण संस्था आणि साखर कारखाने चालवतो. माझ्याकडे स्टाफ किती आहे, किती पात्रतेचा आहे. जवळपास ३०० पीएच.डी. होल्डर माझ्या हाताखाली काम करतात. मी तुम्हाला अंगठेबहाद्दर मंत्री वाटतो का? अशा प्रश्नांचा भडिमार त्यांनी पत्रकारांवरच केला.

दरम्यान, तिवारे धरण फुटीचा खेकड्याशी थेट संबंध लावत, त्यावेळी सोलापुरातून चुकीची बातमी लावण्यात आली. त्यामुळं येथून पुढं मी बोललो तेच दाखवणार नसाल तर माध्यमांनी माझ्यासमोर येऊ नये. त्याचबरोबर ‘हाफकीन’ माणसाकडून औषध घेऊ नका, असं मी बोललो असेन तर मी आत्ताच राजीनामा देतो, अशी भावना व्यक्त करत आरोग्य मंत्र्यांनी आपल्यावर शेकलेल्या विधानाचे खापर माध्यमांवर फोडले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT