Nashik and Barshi Fire
Nashik and Barshi Fire  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Nashik and Barshi Fire : नाशिक, बार्शी स्फोटानं हादरलं; मुख्यमंत्री शिंदेंनी केली मोठी घोषणा

सरकारनामा ब्यूरो

Nashik and Barshi Fire : नाशिक आणि सोलापूरच्या बार्शीमध्ये आज वर्षाच्या पहिल्याच दिवशी दुर्दैवी घटना घडली. नाशिकच्या इगतपुरीमधील जिंदाल कंपनीला भीषण आग लागली. त्यामध्ये दोन जखमी महिलांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १४ जण जखमी झाले असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर बार्शीमध्ये फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्यानंतर आग लागल्याची घटना घडली. त्यामध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

या दोन्ही घटनेने महाराष्ट्र हादरला असून इगतपुरीच्या घटनेत जखमी झालेल्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेऊन विचारपुस केली आहे. तसेच यावेळी त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर केली. तर जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च सरकार करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्याच बरोबर इगतपुरीमधील जिंदाल कंपनीमध्ये झालेल्या स्फोट प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

इगतपुरीतील जिंदाल कंपनीला भीषण आग

नाशिकमधील (Nashik) इगतपुरीच्या मुंढेगावात असलेल्या जिंदाल कंपनीत आज मोठा स्फोट झाला. त्यानंतर या कंपनीला भीषण आग लागली. या दुर्देवी घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या स्फोटात १४ जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या कंपनीतील केमिकल टँकर्सचा स्फोट झाल्यानंतर ही भीषण आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. तर ही आग इतकी भीषण होती की धुराचे मोठ-मोठे लोट आकाशात दिसत होते. या घटनेनंतर अग्नीशमन दलाच्या गाड्या तात्काळ दाखल होत आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

बार्शीतील फटाका फॅक्टरीला मोठी आग

सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत (Solapur Barshi) एका फटाका फॅक्टरीला मोठी आग लागल्याची घटना घडली. यामध्ये देखील अनेक जण होरपळले असून तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेत जखमी झालेल्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच स्थानिक ग्रामस्थांनी व अग्निशमन दलाने फटाका फॅक्टरीला लागलेली आग नियंत्रित केली आहे.

मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत

इगतपुरीमधील जिंदाल कंपनीला भीषण आग लागली. त्यामध्ये दोन जखमी महिलांचा मृत्यू झाला. तर १४ जण जखमी झाले असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी रुग्णालयात दाखल होत जखमीची विचारपुस केली.

तसेच मृत झालेल्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च सरकार करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच जिंदाल कंपनीमध्ये झालेल्या स्फोट प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT