Hasan mushrif Share Audio Clip
Hasan mushrif Share Audio Clip 
पश्चिम महाराष्ट्र

Hasan mushrif Share Audio Clip : 'हा घ्या षडयंत्राचा पुरावा'; मुश्रीफांनी शेअर केली सोमय्यांची कथित ऑडिओ क्लिप

सरकारनामा ब्युरो

Hasan mushrif- kirit Somaiya : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर काही दिवसांपूर्वी सक्तवसुली संचलनालयाने (ED) छापेमारी केली. यावरुन राज्याचं राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. अशातच हसन मुश्रीफांनी भाजप नेते किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

हसन मुर्श्रीफ यांनी किरीट सोमय्या यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर शेअर करत आपल्यावरील ईडीची छापेमारी हे षडयंत्र असल्याचा आरोपही केला आहे. हसन मुश्रीफ यांनी ही कथित ऑडिओ क्लिप किरीट सोमय्यांची असल्याचा दावा केला आहे. या क्लिपमध्ये हसन मुश्रीफांच्या घरावर रेड पडली दिल्लीवाल्यांनी आपली कमिटमेंट पूर्ण केली. असा संवाद या ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आल्याचं म्हटलं आहे.

मुश्रीफ यांनी त्यांच्या ट्विटरवर ही ऑडियो क्लिप शेअर केली आहे. 'षडयंत्राचा हा घ्या पुरावा,'' असं म्हणत मुश्रीफ यांनी ही ऑडिओ क्लिप शेअर केली आहे. 'घरावर रेड सुरू असतानाच सोमय्या म्हणत आहेत की, हसन मुश्रीफांच्या घरावर रेड सुरू झाली आहे, दिल्लीवाल्यांनी आपली कमिटमेंट पूर्ण केली.' यावरुन हे किती मोठे षडयंत्र आहे. याचा हा पुरावा असल्याचं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात ईडीने मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील कागलमधील आणि पुण्यातील घरांवर छापे टाकत कारवाई केली. अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर आज भाजप नेते किरीट सोमय्या आज कोल्हापुर दौऱ्यावर आहेत. हसन मुश्रीफ यांच्यावर झालेली कारवाई योग्यच असून कोणत्याही परिस्थितीत कारवाईत जाती धर्माचे राजकारण करू नये, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT