MLA Jaykumar Gore
MLA Jaykumar Gore sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

आमदार गोरेंना उच्च न्यायालयाचा दिलासा; नऊ जुनपर्यंत अटक टळली

सरकारनामा ब्युरो

मायणी : येथील मयत इसमाची बनावट दस्तऐवज तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेले माणचे आमदार, भाजपाचे सातारा जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांना उच्च न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला आहे. गोरे यांच्या जामीन अर्जावरील अंतिम सुनावणी नऊ जूनला होणार असून तोपर्यंत त्यांना अटक न करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.

त्यामुळे तात्पुरता दिलासा मिळाला असला तरीही, जामीन मंजूर नसल्याने त्यांचेवर अटकेची टांगती तलवार कायम आहे. गोरे यांनी अटकपूर्व जामीन आणि जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयात सादर केला होता. त्यावर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती अनिल पानसरे यांच्या खंडपीठाने ते आदेश दिले.

खटाव तालुक्यातील मायणी येथील मागासवर्गीय समाजातील पिराजी भिसे या मृत व्यक्तीच्या नावे असलेली जमीन हडप करण्याचे हेतूने गोरे यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने बनावट कागदपत्रे, दस्तऐवज तयार केली. भिसे कुटुंबियांची फसवणूक केल्याप्रकरणी आ. गोरे यांच्यासह सहजणांवर दहिवडी पोलिसात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासून आमदार गोरे नॉट रीचेबल आहेत.

ऍट्रॉसिटीचा गुन्हा अजामीनपात्र असल्याने वडूज येथील जिल्हा सत्र न्यायालय व सातारा जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. मग त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशविरूद्ध उच्च न्यायालयात दाद मागितली. त्यासंबंधीची सुनावणी काल (ता.१७) रोजी झाली. मात्र, नायालयाने निकाल राखून ठेवला होता. तो निकाल आज जाहीर करण्यात आला. त्यानुसार, गोरे यांच्या जामीन अर्जावरील अंतिम सुनावणी नऊ जूनला होणार असून तोपर्यंत त्यांना अटक न करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT