Hasan Mushrif Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics: मुश्रीफांनी मुंबईतून महाडिक- क्षीरसागरांना सुनावलं; म्हणाले, '20 वर्षे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीला..!

Local Body Elections: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आम्ही महायुती म्हणून निवडणूक लढवणार आहोत. जिथे शक्य असेल तिथे महायुती आणि जिथे शक्य नसेल तिथं मित्रपक्षांवर टीका न करता ही निवडणूक आम्ही लढवणार आहोत.

Rahul Gadkar

Kolhapur News : आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी कोल्हापुरात भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगलीच स्पर्धा लागली आहे. एकमेकांच्या पक्षातील पदाधिकारी आपल्या पक्षात खेचण्यासाठी धडपड सुरू असताना आतापासूनच जागा वाटपासंदर्भात संघर्ष सुरू झाला आहे.

राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी नुकताच शिवसेनेचा मेळावा घेऊन कोल्हापूर महापालिका निवडणुकीत शिवसेनेला 30 जागा द्याव्यात असा दावा केला आहे. तर मंगळवारी भाजपचे नेते राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी देखील जवळपास 50 जागांवर दावा केला आहे.

त्यावर राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांना चांगलेच सुनावले आहे. गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी आज राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केला. त्या कार्यक्रमावेळी मुश्रीफ बोलत होते.

जिल्हा बँकेचे संचालक आम्ही प्रदेश दौऱ्यावर गेल्या असताना गेल्या दोन ते तीन दिवसातील मी वर्तमानपत्रातील बातम्या पाहिल्या. एक आहेत भाजपचे राज्यसभेचे खासदार आणि दुसरे आहेत शिवसेना शिंदे गटाचे आमदार. कोल्हापूर महानगरपालिकेच्या 81 जागा आहेत. त्या दोघांनीही अशी मागणी केली आहे की, गेली वीस वर्षे सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादीला एक ही जागा ठेवली नाही.

दोघेही 80-80 जागा मागत आहेत. मी माझे नगरसेवक किती निवडून आले याचा उल्लेख करणार नाही पण नेतेमंडळी बसल्यानंतर याबाबतचा निर्णय घेणार. जागा मागण्याचा अधिकार त्यांना आहे. वीस वर्षे राष्ट्रवादी सत्तेत आहे हे त्यांनी विसरता कामा नये. असा सूचक इसारा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुंबईतून राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांना दिला आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आम्ही महायुती म्हणून निवडणूक लढवणार आहोत. जिथे शक्य असेल तिथे महायुती आणि जिथे शक्य नसेल तिथं मित्रपक्षांवर टीका न करता ही निवडणूक आम्ही लढवणार आहोत. महापालिका आणि जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकवण्याची ग्वाही मी देतो, अशी प्रतिक्रिया मंत्री मुश्रीफ यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT