Ahmednagar Crime News : Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ahmednagar Crime News : धक्कादायक : विहिरीत आढळले आई अन् तीन मुलांचे मृतदेह ; रात्री नेमकं काय झालं ?

सरकारनामा ब्युरो

Ahmednagar News : विहिरीत चार जणांचे मृतदेह आढळल्याने पाथर्डी तालुका हादरला आहे. माळीबाभुळगाव हद्दीतील दिपक गोळक यांच्या पोल्ट्रीफार्म शेजारील विहिरीत हे मृतदेह आढळले आहेत. पोल्ट्रीफार्मवर कामासाठी आलेल्या कुंटुबातील एक महिलेसह मुलगा व दोन मुली असे चौघांचे मृतदेह सापडले आहेत. याप्रकरणी महिलेच्या पतीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

मूळचे नांदेड जिल्ह्यातील करोडी येथील हे कुटुंब पोल्ट्रीफार्मवर राहत होते.चौंघाचे मृतदेहाचे शवविच्छेदन पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी सध्या अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. पोलिसांनी मृत महिलेच्या पतीला संशयावरून ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी याप्रकरणी महिलेचा नवरा धम्मपाल सांगडे याला ताब्यात घेतले आहे. पोलिस घटनेचा तपास करीत आहेत. गेल्या एक महिन्यापासून या ठिकाणी धम्मपाल सांगडे व त्याची पत्नी कांचन सांगडे, मुलगा निखील सागडे, मुलगी निषीधा व संचिता असे राहत होते. धम्मपाल सांगडे व त्याची पत्नी कांचन यांच्यात बुधवारी रात्री वाद झाला. यावेळी इतरांनी मध्यस्थी करुन वाद मिटविला.

धम्मपाल सांगडे (वय-३० वर्षे) हा करोडी, ता. हादगाव, जि. नांदेड येथील मुळ रहिवाशी आहे. तो बायको कांचन व एक मुलगा दोन मुली अशांना घेऊन दिपक गोळक यांच्या पोल्ट्रीफार्मवर मजुरीने काम करीत होता.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री नवरा बायको यांच्यात वाद झाल्याचे समजले. त्यानंतर गुरुवारी सकाळी पोल्टीफार्मवर काम करणारा एकजण विहिरीवर मोटार सुरु करायला गेला होता. तेव्हा निषीधा धम्मपाल सांगडे (दीडवर्षे) हीचा मृतदेह विहरीच्या पाण्यावर तरंगताना दिसला. वीजपंपाच्या सहाय्याने पाणी उपसले. तीन ते चार तास पाणी उपसल्यानंतर कांचन धम्मपाल सांगडे (26), निखील धम्मपाल सांगडे ( 6 ), संचिता धम्मपाल सांगडे (4) असे तिघांचे मृतदेह सापडले.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT