Ajit Pawar  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Congress Leader's Desire Of CM: 'मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतंय'; अजित पवारांनंतर काँग्रेस आमदाराने व्यक्त केली इच्छा

Pune Politics: गेल्या आठवड्यात अजित पवार (Ajit Pawar) नाराज असून ते भाजपसोबत जाणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या.

सरकारनामा ब्युरो

Congress News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) नाराज असून ते भाजपसोबत जाणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. त्यातचते नॉट रिचेबल असल्याच्या चर्चांनी तर संपुर्ण राजकारण ढवळून गेलं होतं. त्यामुळे राज्यात पुन्हा सत्तांतर होणार की काय, अशाही चर्चा होऊ लागल्या. पण अजित पवार यांनी स्वत:च जिवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादीबरोबर राहणार, असल्याचं सांगितल आणि या चर्चांना पुर्णविराम दिला.

त्यानंतर, सकाळ माध्यम समुहाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात पुन्हा एकदा त्यांना मुख्यमंत्री पदाची इच्छा बोलून दाखवली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? या प्रश्नाचे उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, होय 100 टक्के आवडेल. तसेच त्यांना 2024 ला मुख्यमंत्रीपदाचा दावा ठोकणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले,''2024 ला काय आताही मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकायला तयार आहे'', असं सूचक विधान अजित पवार यांनी केलं होतं. (Maharashtra Politics)

पण त्यांच्यानंतर आता काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनीदेखील मुख्यमंत्री पदाची अपेक्षा व्यक्त केली आहे. “मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतंय.” असं थेट त्यांनी बोलून दाखवलं आहे. आमदार धंगेकर सोमवारी (२४ एप्रिल) सोलापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांना अजित पवारांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेबद्दल विचारलं. त्यावर “मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतंय.” अशी मिश्लिक टिप्पण्णी त्यांनी केली. तसेच, स्थानिक नेत्यांचा वाद चर्चेच्या माध्यमातून सोडवला जाईल, असं सांगत करमाळातील काँग्रेस पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये असलेल्या गटबाजीवरही भाष्य केलं.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT