Advct.Udaysinh Patil Undalkar  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad : संघर्षासाठी मी तयार, तुम्ही साथ द्या... उदयसिंह उंडाळकर

ॲड. उंडाळकर udaysinh Undalkar म्हणाले, कऱ्हाड तालुक्यात Karad taluka मार्गदर्शन करणारी जुनी मंडळी आपल्यात नाहीत.

सरकारनामा ब्युरो

कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्याची विचारांची घडी पुढे चालू ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. सामान्य माणूस, शेतकऱ्यांसाठी सहकार चळवळ टिकली पाहिजे. उंडाळकर काकांनी दिलेले विचार घेऊन आपण चालणार आहोत. येणाऱ्या काळातील संघर्षासाठी मी तयार आहे, मात्र त्यासाठी तुम्ही साथ द्या, असे भावनिक आवाहन रयत साखर कारखान्याचे अध्यक्ष अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी केले.

खोडशी येथील कोयना संघावर कोजागिरी पौर्णिमेच्या निमीत्ताने कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्याची परंपरा माजी मंत्री (कै) विलासराव पाटील-उंडाळकर यांनी सुरू केली होती. कोरोना व काकांच्या निधनामुळे दोन वर्षे खंड पडला होता. काल पुन्हा अॅड. उंडाळकर यांच्या उपस्थितीत मेळावा झाला.

यावेळी माजी सभापती आप्पासाहेब गरुड, कोयना दूध संघाचे अध्यक्ष वसंतराव जगदाळे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष रंगराव थोरात, मलकपूरच्या नगराध्यक्षा निलम येडगे, माजी प्राचार्य गणपतराव कणसे, प्रा. धनाजीराव काटकर, हणमंतराव चव्हाण, अजित पाटील- चिखलीकर, प्रदीप जाधव, प्रदीप पाटील, प्रकाश पाटील, निवासराव थोरात, अविनाश नलवडे, जयवंतराव जगताप, शहाजीराव देशमुख आदी उपस्थित होते.

ॲड. उंडाळकर म्हणाले, कऱ्हाड तालुक्यात मार्गदर्शन करणारी जुनी मंडळी आपल्यात नाहीत. अशा स्थितीत कऱ्हाड तालुक्याची आचार, विचाराची घडी पुढे चालू ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. सांघिक जोरावर काकांनी नाहिरे वर्गाचे नेतूत्व केले. हे करताना सामान्य माणसांना सत्तेत बसवले. यापुढेही काकांनी दिलेले विचार घेऊन आपण चालणार आहोत यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी संघटना मजबूत करावी.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT