Samadhan Autade
Samadhan Autade Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

मला राजकारणात उतरायचं नव्हतं; पण...

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (जि. सोलापूर) : व्यवसायाच्या व्यापामुळे राजकारणात उतरायचे नाही, असं मी ठरवलं होतं. परंतु अचानकपणे राजकारणात यावं लागलं. जनतेनीही सेवेची संधी दिली, असे वक्तव्य पंढरपूर-मंगळवेढ्याचे भारतीय जनता पक्षाचे (BJP) आमदार समाधान आवताडे (Samadhan Autade) यांनी केले. (I did not want to enter politics : Samadhan Autade)

मंगळवेढ्यातील मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्‌घाटनप्रसंगी आमदार आवताडे बोलत होते. आमदार आवताडे म्हणाले की व्यवसायातील धावपळीमुळे घरच्या नातेवाईकांना आजारी पडल्यावर ‘कसं काय बरं आहे का?’ म्हणण्यासाठी दोन दोन दिवस लागायचे. मंगळवेढा शहर नसून हे एक मोठे खेडे आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी मंगळवेढा शहरातील डॉक्टरांशी चर्चा करताना अचानक उद्‌भवलेल्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी मोठे रुग्णालय सर्व डॉक्टरांच्या मदतीने काढण्याबाबत आपण पर्याय सूचविला होता. आज अडचणीच्या काळात लोकप्रतिनिधींची मदत सर्वसामान्य जनतेला ज्याप्रमाणे होते, त्याचप्रमाणे डॉक्टरांच्या वैद्यकीय सेवेची मदत होते आहे.

सध्याच्या धावपळीच्या परिस्थितीत आमच्यापेक्षा वैद्यकीय क्षेत्रातील लोकांकडून जनतेची सेवा अधिक होत आहे, असेही आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले. या प्रसंगी सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, येताळा भगत, दत्तात्रेय जमदाडे, भाजप जिल्हा संघटक शशिकांत चव्हाण, राजेंद्र सुरवसे, प्रमोद म्हमाणे, औदुंबर वाडदेकर, मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे, प्रदीप खांडेकर, डॉ. नंदकुमार शिंदे व वैद्यकीय तज्ज्ञ व नागरीक उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT