Solapur News : वर्षभरात मी सोलापूरमध्ये दोन वेळा आलो आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच मी सोलापूरकरांसाठी काही तरी देण्यासाठी आलो होतो. आता मात्र मी तुम्हाला काही तरी मागण्यासाठी आलो आहे. मला सोलापूरकरांचे आशीर्वाद हवे आहेत, अशी भावनिक साद पीएम मोदींनी सोलापूर येथील सभेवेळी घातली.
सोलापूर येथील महायुतीचे उमेदवार राम सातपुते (Ram Satpute) यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेप्रसंगी ते बोलत होते. पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांनी सोलापुरातील प्रचार सभेला राम कृष्ण हरी म्हणत सुरुवात केली. सभेची सुरुवात मराठीत करून त्यांनी सर्वांची मने जिंकली. (Narendra Modi News)
एका वर्षात एक पंतप्रधान हा काँग्रेसचा (Congress) फॉर्म्युला आहे. त्याचेच नियोजन आता हे करत आहेत. देशावर पाच वर्षांत पाच पंतप्रधान थोपवण्याच्या तयारीत आहेत. हे लोकांना सहन होणार नाही. भाजपवरील (Bjp) राग काँग्रेस सरकार जनतेवर काढत असल्याचा आरोप या वेळी त्यांनी काँग्रेसवर केला.
या वेळी एससी, एसटी आणि ओबीसींच्या आरक्षणावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले. या समुदायांच्या आरक्षणाला जितकी ताकद देता येईल तितकी ताकद देणार. या समुदायांचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मनोगत व्यक्त करत, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यावर टीका केली. आमदार राम सातपुते या ऊसतोड कामगाराच्या मुलाला विजयी करण्याचे आवाहन केले.
R