MLA Radhakrushn Vikhe Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

मी परिवहन मंत्री म्हणून काम केले आहे... मी एसटी संप चिघळू दिला नसता!

भाजपचे ( BJP ) ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( MLA Radhakrishna Vikhe Patil ) यांनी महाविकास आघाडीवर ( Mahavikas Aghadi ) जोरदार टिका केली.

Amit Awari

लोणी ( अहमदनगर ) : एस.टी महामंडळाच्‍या कर्मचाऱ्यांनी पुन्‍हा संपावर जाण्‍याचा निर्णय काल ( रविवार ) रात्रीपासून घेतला आहे. मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्‍या या आंदोलनाबाबत सरकारकडून कोणताही मार्ग काढला गेला नाही. यामुळे ऐन दिवाळी सणाच्‍या पार्श्‍भूमीवर राज्‍यातील जनतेचे झालेले हाल होत आहे. यावर भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टिका केली. I have worked as the transport minister ... I would not have allowed the ST strike to increase!

आमदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्‍या नाकर्त्‍या भूमिकेमुळेच एसटी महामंडळाच्‍या कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळले आहे, सरकारमध्‍ये निर्णय करण्‍याचे कोणतेही धाडस नाही. कर्मचाऱ्यांच्या संपाला महाविकास आघाडी सरकारच जबाबदार आहे. सरकार आपल्‍या कर्तव्‍यापासून पळ काढत असल्‍याचा आरोप माजी परिवहन मंत्री आमदार राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केला.

ते पुढे म्हणाले, सरकार चालवितांना निर्णय करण्‍याचे धाडस दाखवावे लागते, दुर्देवाने महाविकास आघाडी सरकारमध्‍ये तसे होताना दिसत नाही. कर्मचारी संघटनांशी सरकारने या पूर्वीच संवाद साधून आंदोलनाबाबत मार्ग काढण्‍याची नितांत गरज होती. परंतु सरकारचा संवाद हा फक्‍त फेसबूकवर राहिला असल्‍याचा टोला त्यांनी लगावला.

यापूर्वीही कर्मचाऱ्यांची आंदोलन झाली. त्‍यावेळी सरकार आणि संबंधित मंत्र्यांनी योग्‍तो समन्‍वय ठेवून त्‍यामध्‍ये मार्ग काढले. यापूर्वी राज्‍यात देवेंद्र फडणवीस यांच्‍या नेतृत्‍वाखालील युती सरकारमध्‍ये शिवसेनेचे दिवाकर रावते हेच परिवहन मंत्री होते मात्र त्‍ काळात कर्मचाऱ्यांना असे आंदोलन करावे लागले नाही. मग आताही महाविकास आघाडी सरकारमध्‍ये शिवसेनेकडेच परिवहन खाते आहे, मग नेमकी परिस्थिती आत्‍ताच का ओढावली असा सवालही त्‍यांनी उपस्थित केला.

या राज्‍यात परिवहन मंत्री म्‍हणून मी सुध्‍दा काम केले. त्‍या त्‍या वेळी निर्माण झालेल्‍या समस्‍यांमध्‍ये संघटनांशी संवाद साधून त्‍यांना विश्‍वासात घेवून निर्णय केले. महाविकास आघाडी सरकार मात्र स्‍वत:च्‍या कर्तव्‍यापासूनच पळ काढत असून, राज्‍यातील शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्‍य माणून यांच्‍या प्रश्‍नांचे कोणतेही देणेघेणे या सरकारमधील मंत्र्यांना राहिलेले नाही. केवळ आपले अपयश झाकण्‍यासाठी सरकारमधील मंत्रीच ड्रग्‍ज याच विषयावर सातत्‍याने भाष्‍य करुन, जनतेचे लक्ष विचलीत करीत आहेत. राज्‍यातील सर्व प्रश्‍न संपले आहेत का? असा प्रश्‍न करतानाच समीर वानखेडेंचे काय करायचे हे चौकशी अंती समोर येईल. परंतु यावर सरकारने आता वेळ दडवता कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत तातडीने निर्णय करावा सरकारमध्‍ये त्‍यांना सामावून घ्‍यायचे अथवा नाही त्‍याबाबत समिती गठीत करावी अशी मागणी त्‍यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT