Jaykumar Gore, Ramraje Naik Nimbalkar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

रामराजेंसारख्या पापी माणसाशी माझं कधीही जमणार नाही...

जिहे-कठापूरचे Jihe Katapur पाणी शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत पोहचले नाही तर, मी निवडणूक लढवणार नाही. या शब्दावर मी आजही ठाम आहे, असेही आमदार MLA गोरे Jaykumar Gore यांनी स्पष्ट केले.

रूपेश कदम

दहिवडी : काहीजणांना वाटतंय माझं रामराजेंशी जमतंय का? पण, रामराजेंसारख्या पापी माणसाशी माझं कधी जमणार नाही, असे स्पष्ट मत माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.

साधारण पाच कोटी रक्कमेच्या सितामाई घाट रस्त्याचे भूमीपूजन माढाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार गोरे म्हणाले, ''जलसंपदा खात्याचे मंत्री असताना त्यांनी प्रामाणिकपणे ठरवलं असतं तर, आज माण-खटाव सुजलाम सुफलाम झाला असता. पण, त्यांनी हे काम केले नाही. संघर्ष विकासासाठी असला पाहिजे.''

सितामाई रस्त्यासाठी, जिहे-कटापूरसाठी कधी राष्ट्रवादीने संघर्ष केलाय का? त्यांच्या स्थानिक नेत्यांना जिहे-कटापूर माहिती आहे का? जिहे-कटापूरचे पाणी शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत पोहचले नाही तर, मी निवडणूक लढवणार नाही. या शब्दावर मी आजही ठाम आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्व नेते जिहे-कटापूरचं पाणी माणमध्ये येऊ नये, असा प्रयत्न करत आहेत.

आज कुळकजाई भागाला पाणी द्या ही मागणी इथली माणसं करत आहेत. ही भावना का निर्माण झाली, असा प्रश्न करून आमदार गोरे म्हणाले, जनतेला माहिती आहे, आपला आमदार, आपला खासदार डोंगरावरही पाणी आणू शकतो. सितामाईच्या कृपेने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर कुळकजाईला पाटाने पाणी येईल. एवढी ताकद त्या माणसाच्यात आहे, असेही आमदार गोरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT