Uttam Jankar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

MLC Election : मी वसंतराव देशमुखांना मतदान करणार नाही : पवारांच्या आमदाराने पुन्हा ठणकावले

Uttam Jankar Statement : उत्तम जानकर यांनी मोहिते पाटील कुटुंबावर गंभीर आरोप करत आपल्या आमदारकीच्या मार्गात अडथळे निर्माण करण्यासाठी जातीच्या दाखल्याबाबत तक्रारी केल्याचा दावा केला.

Vijaykumar Dudhale

Solapur, 12 June : माळशिरस तालुक्यात पुन्हा नव्याने मोहिते पाटील यांनीच ‘जानकर आणि मोहिते पाटील’ असा संघर्ष चालू केला आहे, असे म्हणायला हरकत नाही. त्याची सुरुवात तर पुन्हा झालेली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी दिलेला शब्द पाळण्यासाठी विमानातून उडी टाकून आलो. मात्र मी आमदार होऊ नये; म्हणून मोहिते पाटील कुटुंबातील लोकांनी माझा जातीचा दाखला रद्द करण्यात यावा, यासाठी देवेंद्र फडणवीसांपर्यंत तक्रारी केल्या, असे उत्तम जानकर यांनी सांगितले.

माझा विश्वासघात, फसवणूक आणि माझी मानहानी करून वसंत देशमुख यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आलेली आहे, त्यामुळे मी वसंतनानाला मतदान करणार नाही, अशी भूमिका मी यापूर्वीच स्पष्ट केलेली आहे. माझ्या मुलाची उमेदवारी ठरलेली असताना गैरविश्वास दाखवून पुन्हा उमेदवारी अर्ज भरणे, पुन्हा आमचीच उमेदवारी आहे; म्हणून अंतिम करणे आणि त्यानंतर वसंत देशमुखांची उमेदवारी कायम ठेवणे. मागील काळातही मोहिते पाटील यांची अशीच भूमिका राहिलेली आहे. त्यांच्या या भूमिकेला मी कंटाळून गेलो आहे, असेही आमदार जानकर यांनी नमूद केले.

ते म्हणाले, सध्या सर्वांना बरोबर घेऊन चालणं गरजेचे आहे. कारण, महाविकास आघाडीचा सध्याचा काळ हा अत्यंत अडचणीचा आहे. अशावेळी नेतृत्वाने सर्वांना बरोबर घेऊन काम केलं पाहिजे. मात्र, ती उंची जिल्ह्यातील नेतृत्वाकडे सध्या दिसत नाही. मोहिते पाटील यांच्यासोबत कोण आहे, हे मला माहिती नाही, पण महाविकास आघाडीतील चार आमदारांनी राजेंद्र राऊत यांना पाठिंबा दिलेला आहे.

लोकसभा निवडणुकीवेळीची माझी भूमिका सर्वांनी पाहिलेली आहे. मदतीची भूमिका घेऊन आम्ही उतरलेलो असताना विधानसभा निवडणुकीत मी आमदार होऊ नये म्हणून वेगवेगळ्या क्लृप्त्या आणि डावपेच केले. अगदी देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत जाऊन माझा जातीचा दाखला रद्द करा, असा आग्रह मोहिते पाटील यांनी धरला होता, अशा पद्धतीने मोहिते पाटील कुटुंबासोबत कोणी जास्त काळ राहू शकत नाही, असा दावाही जानकर यांनी केला.

उत्तम जानकर म्हणाले, भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत हे माझे मित्र आहेत, त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपला मदतीची भूमिका माझी असणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही माझ्या मुलाच्या उमेदवारीचा निर्णय घेतला होता. पण, ऐनवेळी ती रद्द करून वसंत देशमुख यांना देण्यात आली. मी आणि राम सातपुते एकत्र काम करणार का? हे काळच ठरवेल. विधान परिषदेसाठी तरी राजेंद्र राऊत यांनाच माझा पाठिंबा राहणार आहे, असेही उत्तम जानकर यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT