Shahajibapu Patil
Shahajibapu Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shahajibapu Patil: ज्यावेळी ‘ते’ माझ्या गाडीत बसले, त्या दोन निवडणुकांमध्येच माझ्यावर गुलाल पडला; शहाजीबापूंनी सांगितला विजयाचा किस्सा

सरकारनामा ब्यूरो

Sangola News : साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबूराव गायकवाड हे नाव माझ्यासाठी नगदी नाणं आहे. ज्या दोन निवडणुकीवेळी गायकवाड माझ्या गाडीत बसले, त्याच दोन निवडणुकांमध्ये माझ्यावर गुलाल पडला. नाही तर माझ्या वाट्याला गुलाला आलेला नव्हता. त्यामुळे बाबूरावभाऊंना आणखी कमीत कमी २५ वर्षे तर आयुष्य मिळावं, असं मला वाटतं, असे गौरवोद॒गार आमदार शहाजी पाटील (Shahajibapu Patil) यांनी काढले. (I won in the same two elections : Shahajibapu Patil)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबूराव गायकवाड यांचा अमृत महोत्सवानिमित्त ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्या कार्यक्रमात शहाजी पाटील बोलत होते. ते ते म्हणाले की, पवारसाहेबांची आणि बाबूराव गायकवाड यांची भेट कुठे झाली, असे अनेकजण विचारतात. पण, सांगोला (Sangola) तालुक्याचे ज्येष्ठ नेते संभाजीराव शेंडे आणि पंढरपूरचे तत्कालीन आमदार औदुंबर अण्णा पाटील या दोन व्यक्तींमुळे औदुंबरअण्णांच्या अडतीवर गायकवाडांचा पवारांशी संपर्क आला.

एस काँग्रेसच्या निर्मितीत रतिलालशेठजीकडे अध्यक्षपद गेलं. लक्ष्मण ढोबळेंकडे युवक काँग्रेसचे अध्यक्षपद, तर माझ्याकडं महाराष्ट्राचं युवक काँग्रेसचं सचिवपद आलं होतं. सांगेाला तालुक्यात बाबूराव गायकवाड यांच्याकडे एस काँग्रेसचे पहिलं पद आलं आणि त्यांच्या जीवनात नवीन वाट सुरू झाली, असेही पाटील यांनी नमूद केले.

शहाजीबापू म्हणाले की, शरद पवारसाहेब सांगतील तेच काम आम्ही लोकसभेला करायचो. पण, विधानसभा म्हटलं की आम्ही वेगवेगळ्या दिशेला निघून जायचो. बाबूराव भाऊ मात्र पवारांच्या आदेशासोबत घट्ट राहायचे. संपूर्ण तालुक्याच्या राजकारणात गेल्या ५० वर्षांत मला अनेक माणसं पारखता आली. पण, दिलेल्या शब्दाला पक्का राहणारा माणूस म्हणून बाबूराव गायकवाड यांचा उल्लेख आपल्याला करावाच लागतो. साहेब, बाबूराव गायकवाड हे नाव माझ्यासाठी नगदी नाणं आहे. ज्यावेळी गायकवाड माझ्या गाडीत बसलं, त्याच दोन निवडणुकीत माझ्यावर गुलाल पडला. नाही तर माझ्या वाट्याला गुलाला आलेला नव्हता. त्यामुळे भाऊला कमीत कमी २५ वर्षे तर आयुष्य मिळावं असं मला वाटतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT