Suresh Halvankar, Prakash Awade Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ichalkaranji BJP Politics : आवाडे-हळवणकरांची भांडणं काही केल्या मिटेनात; आजी-माजी आमदारांच्या वादाने भाजपला सुधरेना

Prakash Awade Suresh Halvankar Conflict : विधानसभा निवडणुकीत दिलजमाई झालेल्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील भाजपमध्ये पुन्हा एकदा संघर्षाची चिन्हे निर्माण झाली आहेत. पारंपारिक कट्टर विरोधक माजी आमदार प्रकाश आवाडे आणि माजी आमदार सुरेश हळवनकर हे निवडणुकीच्या निमित्ताने आणि भाजपच्या छताखाली एकत्र आहे आहेत.

Rahul Gadkar

Kolhapur News, 29 Apr : विधानसभा निवडणुकीत दिलजमाई झालेल्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील भाजपमध्ये पुन्हा एकदा संघर्षाची चिन्हे निर्माण झाली आहेत. पारंपारिक कट्टर विरोधक माजी आमदार प्रकाश आवाडे आणि माजी आमदार सुरेश हळवणकर हे निवडणुकीच्या निमित्ताने आणि भाजपच्या छताखाली एकत्र आहे आहेत.

मात्र, त्यानंतर दोन्ही गटात वर्चस्ववादाची लढाई सुरू आहे की काय? असा सवाल उपस्थित होत आहे. इचलकरंजी या एकाच शहरात भाजपचे दोन स्वतंत्र कार्यालय झाल्याने पुन्हा एकदा आवाडे आणि हळवणकर यांच्यातील अंतर्गत संघर्ष निर्माण झाला की काय? हा देखील सवाल उपस्थित होत आहे.

त्यात पुन्हा एकदा या दोन्ही गटांमध्ये मंडल अध्यक्ष निवडीवरून देखील छुपा संघर्ष पाहायला मिळत असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. इचलकरंजी शहरात तीन मंडळ अध्यक्ष निवडण्यात येणार आहेत. त्यामध्ये तिसऱ्या एका मंडल अध्यक्षावरून माजी आमदार प्रकाश आवाडे आणि माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या गटात संघर्ष उफाळण्याची शक्यता आहे.

सध्या दोन मंडल अध्यक्षपदाच्या नावाबाबत एकमत झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर उर्वरित एका मंडल अध्यक्ष निवडीबाबत आवाडे-हाळवणकर गटात एकमत न झाल्यामुळे गुंता वाढला आहे. दोन माजी नगरसेवकांची यासाठी चुरस सुरू आहे.

यामध्ये कोणाला मंडल अध्यक्षपदाची संधी मिळणार, याकडे भाजप वर्तुळाचे लक्ष लागले असताना आवाडे आणि हळवणकर गटाचा अंतर्गत वाद आता उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोर्टात पोहोचला आहे.

रविवारी मंत्री पाटील यांनी आवाडे आणि हळवणकर यांची बैठक घेत या वादावर मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र दोन्ही गटांकडून या मंडल अध्यक्षपदावर दावा केला जात आहे. त्यामुळे हे पद कोणाच्या नशिबी येणार हेच आता पहावे लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT