Kolhapur Politics Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ichalkaranji: महायुतीच्या निर्णयावर महाविकास आघाडीचे भवितव्य; उमेदवार शोधताना होणार कसरत

Ichalkaranji municipal elections 2025 Mahayuti Vs MVA: :महायुतीकडून उमेदवारी न मिळाल्या काहींची मानसिकता महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळवून निवडणुकीला सामोरे जाण्याची आहे. या पार्श्वभूमीवर सध्या महाविकास आघाडीने संभाव्य उमेदवारांबाबत सबुरीचे धोरण घेतल्याचे दिसत आहे.

Rahul Gadkar

kolhapur News: इचलकरंजी महापालिकेची घोषणा झाल्यानंतर पहिलीच निवडणूक यंदा होणार आहे. अशातच विधानसभा आणि लोकसभेला घवघवीत यश मिळाल्यानंतर महायुतीची पॉवर अधिकच वाढली आहे. त्यामुळे इच्छुकांचा ओढा महायुतीकडे असल्याने महाविकास आघाडीला काही मतदारसंघात उमेदवार शोधूनही सापडेनात अशी परिस्थिती आहे. त्यामुळे काही इच्छुकांनी वेट अँण्ड वॉचची भूमिका घेतली आहे.

महायुतीकडून उमेदवारी न मिळाल्या काहींची मानसिकता महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळवून निवडणुकीला सामोरे जाण्याची आहे. या पार्श्वभूमीवर सध्या महाविकास आघाडीने संभाव्य उमेदवारांबाबत सबुरीचे धोरण घेतल्याचे दिसत आहे. परिणामी, पुढील काळात काही प्रभावी चेहरे महाविकास आघाडीत सामील होतील, अशी आशा नेते मंडळींना आहे.

महाविकास आघाडातील काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) यांची वोट बँक शहरात आहेत. त्यांना काही छोट्या-छोट्या पक्षांची ताकद पुढील काळात मिळण्याची आशा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला सर्वच जागांवर उमेदवार मिळण्यास अडचण येईल, असे चित्र सध्या तरी वाटत नाही, पण निवडून येण्याची क्षमता हा निकष लावण्यास प्राधान्य राहणार असल्याचे नेतेमंडळींचे मत आहे. त्यामुळे प्रभावी उमेदवारांची चाचपणी आघाडीकडून करण्यात येत आहे.

प्रत्येक प्रभागात एक तरी प्रभावी चेहरा असावा, याकडे महाविकास आघाडीचे नियोजन आहे. त्यादृष्टीने काही प्रभागांत प्रभावी असे संभाव्य उमेदवार निश्चित केले आहेत. त्यांच्याकडून संबंधित प्रभागातील उर्वरित तीन उमेदारांचा आता शोध सुरू झाला आहे. प्रभागाची भौगोलिक व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे निवडणूक लढविणे सोपे नाही. परिणामी, काही प्रभागांत उमेदवारांचा शोध घेताना महाविकास आघाडीला कसरत करावी लागण्याची शक्यता आहे. अद्याप महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. त्यामुळे आघाडीतील कोणत्या घटक पक्षाला किती जागा मिळणार हे निश्चित नाही.

आघाडीकडून एका चिन्हाचा प्रयोग राबवण्यात येणार आहे. त्यामुळे जागा वाटपाचा विषय फारसा गुंतागुंतीचा होईल, असे वाटत नाही. सध्या महाविकास आघाडीकडेही इच्छुकांची संख्या जास्त असल्याचा दावा नेतेमंडळींकडून करण्यात येत आहे; पण निवडून येण्याची क्षमता हा निकष महत्त्वाचा असल्यामुळे प्रबळ उमेदवारांनाच पसंती दिली जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी अंतिम टप्प्यात काही तडजोडी केल्या जाण्याचे संकेत मिळत आहेत.

आघाडीत बिघाडी होण्याची भीती

महाविकास आघाडी लोकसभा, विधानसभेप्रमाणेच महापालिका निवडणुकीत एकसंध ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे; पण आघाडीत बिघाडी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. प्रभावी उमेदवारांना आपल्या तंबूत खेचण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे, पण आमच्यातून कोणीही फुटणार नाहीत, असा दावा आघाडीच्या नेतमंडळींनी केला आहे. पण पुढील काळात फोडाफोडीच्या राजकारणाला वेग येणार असल्याचे संकेत यातून मिळत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT