Party workers celebrate as Ichalkaranji Municipal Election reservation is announced. BJP and MVA supporters prepare for an intense candidature contest. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ichalkaranji Election 2025 : इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत निराशा; आरक्षणाने अडवली विठ्ठल चोपडे, संजय केगारांची वाट

Ichalkaranji Election Reservation Declared : इचलकरंजी महानगरपालिकेची यंदा पहिलीच निवडणूक आहे. इचलकरंजी नगरपालिकेवर 4 वर्षे प्रशासक राज राहिल्यानंतर मध्यंतरीच्या काळात महानगरपालिकेची आज आरक्षण सोडतीनंतर सगळेच इच्छुक खुश झालेत.

Rahul Gadkar

Kolhapur News, 12 Nov : इचलकरंजी महानगरपालिकेची यंदा पहिलीच निवडणूक आहे. इचलकरंजी नगरपालिकेवर 4 वर्षे प्रशासक राज राहिल्यानंतर मध्यंतरीच्या काळात महानगरपालिकेची आज आरक्षण सोडतीनंतर सगळेच इच्छुक खुश झालेत.

काही अपवाद वगळता बहुतांश प्रभागात आपल्या मनासारखी आरक्षण पडल्याने इचलकरंजीत इच्छूकांच्या मनामध्ये लड्डू फुटले आहेत. मनासारखे आरक्षण पडावे यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते. अखेर आरक्षण पडल्यानंतर इच्छुक आणि कारभाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. आता कारभाऱ्यांना महापौरपदाच्या आरक्षणाचे वेध लागले आहे.

महापौर पदासाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर निवडणूकीतील चुरस आणखी वाढणार आहे. या पदासाठी आतापासूनच कांहीजणांनी मोर्चे बांधणी केली आहे. संभाव्य आरक्षणाचा अंदाज बांधून आतापासूनच कांहीजण फिल्डींग लावत आहेत. त्यामुळे महापौरपदाच्या आरक्षणाकडेही आतापासूनच विशेष लक्ष लागले आहे.

इचलकरंजी महानगरपालिकेसाठी आरक्षण सुटल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आता इच्छुकांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी चुरस वाढणार आहे. दुसरीकडे गेल्या कांही दिवसांपासून मंदावलेल्या राजकीय हालचालींना गती येणार आहे. त्यामुळे पुढील काळात अनेक धक्कादायक घडामोडी होण्याची शक्यता आहे.

महापालिकेचे पहिलेच सभागृह अस्तित्वात येणार आहे. त्यामुळे या पहिल्या सभागृहाचा नगरसेवक होण्याचा मान मिळविण्यासाठी अनेकजण आतूर आहेत. निवडणूकीची चाहूल लागल्यानंतर अनेक इच्छुक सक्रीय झाले आहेत. अपेक्षीत आरक्षण पडल्यानंतर इच्छुकांनी जल्लोष करीत तत्काळ प्रभागातील जोडण्या लावण्यास सुरुवात केली.

काही जणांनी जय्यत तयारी केली होती. मात्र अपेक्षेप्रमाणे आरक्षण न पडल्यामुळे त्यांच्या पुढच्या तयारीला तुर्त तरी ब्रेक लागणार आहे. बहुतांशी प्रभागात उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच पहावयास मिळणार आहे. एकाच प्रभागात इच्छुकांची संख्या मोठी आहे.

विशेषतः भाजपकडून इच्छुकांची भाऊगर्दी आहे. प्रत्येक प्रभागात चार जागांसाठी १० ते १२ नावांची चर्चा आहे. त्यामुळे उमेदवारी देतांना भाजप पक्षश्रेष्ठींची कसरत होण्याची शक्यता आहे. किंबहूना बंडखोरीची भिती अधिक आहे. भाजपकडील उमेदवारांच्या निर्णयावरच महाविकास आघाडीची भिस्त असल्याचे सध्या तरी चित्र आहे.

महिला आरक्षणाचा यांना बसला फटका

महिला आरक्षणाचा फटका कांही इच्छुकांना बसला आहे. यामध्ये माजी पाणी पुरवठा सभापती विठ्ठल चोपडे, माजी आरोग्य सभापती संजय केंगार, माजी बांधकाम सभापती भाऊसाहेब आवळे, युवा उद्योजक संग्राम स्वामी आदींना बसला आहे. त्यांना आता पर्याय शोधावा लागणार आहे.

तर काही जणांना आरक्षीत मतदारसंघातून संधी मिळणार नसल्यामुळे खुल्या प्रवर्गातून निवडणूकीस उभे राहण्यासाठी तयारी सुरु केली आहे. दुसरीकडे आपणास संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अनेकांनी महिला राखीव जागेवर आपल्या घरातील महिलांना निवडणूक रिंगणात उतरविण्याची तयारी सुरु केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT