Ichalkaranji Municipal Election  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Municipal Election News : इचलकरंजीत मोठ्या घडामोडी; ठाकरेंकडून आघाडीला धक्का, महायुतीची ताकद वाढली...

Ichalkaranji municipal election : इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महायुतीमध्ये पुन्हा एन्ट्री झाली आहे.

Rahul Gadkar

NCP joins Mahayuti : इचलकरंजी महानगरपालिकेसाठी रविवारचा दिवस आणि रात्र हा मोठ्या घडामोडीची ठरली. सुरुवातीच्या टप्प्यात भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार अशी चर्चा असतानाच आता त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची देखील एन्ट्री होणार असल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीमध्ये दोन जागा मिळणार असल्याचे समजते. रात्री उशिरापर्यंत या संदर्भात महत्वाच्या बैठका सुरू होत्या. दुसरीकडे शिव-शाहू आघाडीला धक्का बसला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्वबळाचा नारा देण्यात आला आहे.

महाविकास आघाडीच्या शिव-शाहू विकास आघाडीने सन्मानपूर्वक जागा न दिल्यामुळे शिवसेना (उबाठा) पक्ष स्वबळावर इचलकरंजी महापालिकेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. याबाबतची घोषणा जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी केली. शिव-शाहू विकास आघाडीतून आम्हाला किमान १५ जागा मिळाव्यात, अशी मागणी केली होती. त्यामध्ये तडजोडीने किमान ८ ते १० जागा मिळतील, अशी अपेक्षा होती. पण, प्रत्यक्षात केवळ दोन जागा आम्हाला देण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे शिवसैनिकांना नाराज न करता किमान २५ ते ३० जागा स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे.

महाविकास आघाडीप्रणित या आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उबाठा) हे प्रमुख घटक पक्ष होते. पण, त्यातील शिवसेना (उबाठा) पक्षाने आघाडीतून बाहेर पडल्याची घोषणा केल्यामुळे शिव-शाहू विकास आघाडीला धक्का बसला आहे. शिवसेनेला मानणारा वर्ग शहरातील विविध भागांत आहे. त्यांच्या मताचा लाभ शिव-शाहू विकास आघाडीला झाला असता. मात्र, आता या निर्णयाचा त्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महायुतीमध्ये पुन्हा एन्ट्री झाली आहे. या पक्षाला दोन जागा देण्याबाबत रात्री उशिरा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीमध्ये भाजप, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) असे घटक पक्ष एकत्रित येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जादा जागांची मागणी केली होती; पण तडजोड न झाल्यामुळे स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार परस्पर उमेदवारांची घोषणा केली होती. त्यानंतर भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांची युती होणार हे जवळपास स्पष्ट झाले होते. त्यानुसार ५४ व ११ असा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. मात्र, आज अचानक आज रात्री मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला. रात्री उशिरा झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महायुतीमध्ये समाविष्ट करून घेण्याचा निर्णय झाल्याचे सांगण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT