Dhananjay Mahadik Latest Marathi News
Dhananjay Mahadik Latest Marathi News sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राज्यसभेचं मैदान मारून पैलवान कोल्हापुरात परतला; महाडिकांनी आठ वर्षांनी उधळला गुलाल

सरकारनामा ब्यूरो

कोल्हापूर : अत्यंत प्रतिष्ठेच्या, अटीतटीच्या राज्यसभा (Rajya Sabha Election) निवडणुकीत विजयश्री खेचून आणणारे धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) हे आज (ता. १२) कोल्हापुरात पोचले. मागील अनेक वर्षांपासून महाडिक कुटुंबाला स्थानिक राजकारणात पिछाडीवर रहावे लागले होते. मात्र, यंदा राज्यसभा निवडणुकीत त्यांना विजय मिळाला आहे. (Dhananjay Mahadik Latest Marathi News)

धनंजय महाडिक यांनी त्यांचे काका महादेवराव महाडिक यांचे आशिर्वाद घेतली. आपला विजय त्यांनी आईला समर्पीत केला. कोल्हापूरात दाखल झालेल्या महाडिकांचे कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. भाजपच्या (BJP) पदाधिकाऱ्यांनी ढोल ताश्यांच्या गजरात महाडिकांचे स्वागत केले.

यावेळी कार्यकर्त्यांनी धनंजय महाडिक आणि अमल महाडिक यांना खांद्यावर घेत जल्लोष केला. यावेळी अमल महाडिक म्हणाले, भाजपने एवढी मोठी संघी आम्हाला दिली असून संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्याचे प्रश्न आमचा परिवार आणि माझे खासदार धनंजय महाडिक अग्रक्रमाने सोडवतील. दरम्यान, विजयी सभेला संबोधित करताना धनंजय महाडिक म्हणाले, राज्यसभेच्या निमित्ताने महाडिक कुटुंबिंयाचा बॅडपॅच संपला आहे. या पुढील निवडणुकीतही हाच उत्साह कायम राखू.

दरम्यान, मुंबईहून कोल्हापूरला जात असताना ठिकठिकाणी त्यांचे स्वागत झाले. तसेच, ज्यांनी ज्यांनी निवडणुकीत मतदानरुपी मदत केली, त्यांना भेटून महाडिकांनी आभारही मानले. कराड येथे महामार्गावर योगायोगाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांची आणि महाडिकांची भेट झाली. त्यावेळी नवनिर्वाचित खासदार महाडिक यांनी शेट्टींना वाकून नमस्कार करत आशीर्वाद घेतले, तर शेट्टींनी त्यांचे विजयाबद्दल स्वागत केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT