Ram Satpute ZP Victory Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur ZP Result : सोलापुरात मोहिते पाटील, जानकरांना धक्का; सातपुते, सावंत, कल्याणशेट्टी, चैत्राली मुळे यांचा विजय

Solapur ZP Result 2026 : सोलापूर जिल्हा परिषदेच्या पहिल्या निकालात माळशिरसमधून अर्जूनसिंह मोहिते पाटील व आमदार उत्तम जानकर यांच्या मुलाचा पराभव झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 09 February : सोलापुरातील जिल्हा परिषदेचा पहिला निकालात अनेक प्रस्थापितांना धक्का बसला आहे. माळशिरस तालुक्यात दहिगाव-गुरसाळे गणातून अर्जूनसिंह मोहिते पाटील यांचा पराभव झाला आहे.

ते फोंडशिरस गटात जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत आहेत. आमदार उत्तम जानकर यांच्या मुलाचा पराभव झाला आहे. माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नीने आमदार जानकर यांच्या मुलाचा पराभव केला आहे.

अक्कलकोट तालुक्यातून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे बंधू सागर कल्याणशेट्टी चपळगाव गटातून विजयी झाले आहेत, तर त्यांची पत्नी शांभवी कल्याणशेट्टी ह्या चपळगाव गणातून विजयी झाल्या आहेत. माळशिरस तालुक्यातून आमदार उत्तम जानकर यांच्या मुलाचा पराभव करत माजी आमदार राम सातपुते यांची पत्नी संस्कृती सातपुते विजयी झाल्या आहेत.

उत्तर सोलापूर तालुक्यात नान्नज गटातून भाजपच्या चैत्राली मुळे विजयी झाल्या आहेत. करमाळ्यात भाजपच्या रश्मी बागल विजयी झाल्या आहेत. करकंब गटात भाजपचे आदिनाथ देशमुख १११६ मतांनी विजयी झाले आहेत. माढा तालुक्यातून भाजपाचे पृथ्वीराज सावंत हे मानेगावातून विजयी झाले आहेत.

बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे गटातून भाजपचे अनिल वैद्य, तर गणातून भाजपच्या मीनाक्षी रोंगे विजयी झाल्या आहेत. बोरामणी जिल्हा परिषद गटातून भाजपचे नेताजी खंडागळे हे ८४४ मतांनी, बोरामणी गणातून भाजपच्या वर्षा पटणे २१३९ मतांनी, तर कासेगाव गणातून भाजपचे विजय राठोड हे २२८८ मतांनी विजयी झाले आहेत.

दहीगाव गटात संस्कृती सातपुते विजयी, तर गुरसाळे गण - दत्तात्रय विठोबा शेळके, तर दहिगाव गणातून नुजा बाळू खिलारे हे भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. आष्टी गटातून विजयराज डोंगरे हे राष्ट्रवादीकडून विजयी झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT