Prathamesh Kote
Prathamesh Kote Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur News : सोलापुरातील बड्या नेत्याच्या मुलाने हिंदु गर्जना मोर्चात तलवार नव्हे; लाकडी दांडा फिरवला; पोलिसांचा तपासात दावा

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : हिंदू गर्जना मोर्चात हातात तलवार घेऊन हवेत फिरवल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे (NCP) नेते महेश कोठे (Mahesh Kote) यांचे चिरंजीव, माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्याविरूद्ध फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी त्याअनुषंगाने तपास केला, त्यावेळी व्हिडिओ व फोटोंच्या पडताळणीत ती वस्तू तलवार नव्हे; तर लाकडी दांडा होता, असा दावा पोलिसांच्या तपासणीत करण्यात आलेला आहे. (In the Hindu Garjana Morcha, Prathamesh Kote had a wooden stick in his hand, not a sword)

सोलापुरात संघ परिवाराच्या वतीने लव्ह जिहाद, गोहत्या यासह विविध विषयांवर जोरदार शक्तिप्रदर्शन करीत ता. २६ मार्च रोजी हिंदू गर्जना मोर्चा काढण्यात आला होता. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते माजी महापौर महेश कोठे यांच्यासह त्यांचे चिरंजीव माजी नगरसेवक प्रथमेश कोठे हेही सहभागी झाले होते.

त्या मोर्चात प्रथमेश कोठे यांनी हातात तलवार घेऊन गर्दीत हवेत फिरविल्याने हा गुन्हा दाखल झाला होता. फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक विनोद व्हटकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्रथमेश कोठेंविरूद्ध गुन्हा दाखल झाला होता.

हिंदू गर्जना मोर्चामध्ये प्रथमेश कोठे सहभागी होऊन मोर्चा माणिक चौकात आल्यावर लाल वेष्टनात गुंडाळून आणलेली तलवार हातात बाळगली आणि मोर्चेकऱ्यांच्या गर्दीत हवेत फिरविली. यात पोलिस प्रशासनाने दिलेल्या कायदेशीर आदेशाचे उल्लंघन झाले होते. त्यानंतर पोलिसांनी या प्रकाराची फेरपडताळणी केली. त्यावेळी लाल वेष्टनात गुंडळालेली ती वस्तू तलवार नव्हती; तर लाकूड होते, असा दावा पोलिसांच्या तपासात करण्यात आलेला आहे.

पुढील आठवड्यात कोर्टात अहवाल सादर होणार

फौजदार चावडी पोलिसांनी प्रथमेश कोठे यांच्यावरील गुन्ह्याची पडताळणी केली आहे. त्यांच्या हातात लाकूडच होते, हे स्पष्ट झाले आहे. तरीही, आणखी काही बाबी तपासल्या जात आहेत. चौकशी पूर्ण झाल्यानंतर पुढील आठवड्यात त्यासंबंधीचा अहवाल न्यायालयात सादर केला जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT