Rajgad Sugar Factory
Rajgad Sugar Factory Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राजगड कारखाना निवडणूक: निवडणूक निर्णय अधिका-यांसमोर निर्माण झाला पेच

सरकारनामा ब्यूरो

भोर : अनंतनगर-निगडे (ता.भोर) येथील राजगड सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीकरीता (Rajgad Sugar Factory Election) दाखल केलेल्या अर्जांच्या छाननी प्रक्रीयेत कॉग्रेस व विरोधी पक्षांनी घेतलेल्या हरकतींमुळे निवडणूक निर्णय अधिका-यांसमोर पेच निर्माण झाला आहे.त्यामुळे अर्जाच्या छाननीचा निकाल देण्यास काही तासांचा कालावधी लागणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी सांगितले.

राजगडच्या १७ जागांसाठी एकून ४५ अर्ज दाखल झाले होते. त्यांची सोमवारी (ता.2 मे) सकाळी 11 वाजता प्रांताधिका-यांच्या कार्यालयात अर्जांच्या छाननीस सुरुवात झाली. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सर्व अर्जांवरील हरकती घेण्यात आल्या. त्यानंतर मात्र छाननीचा निकाल ऐकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते राजवाडा चौकात भर ऊन्हात वाट पहात थांबले होते.

विरोधी पक्षातील भाजपा, राष्ट्रवादी कॉग्रेस व शिवसेना यांनी कॉंग्रेसचे कारखान्याचे संस्थापक अनंतराव थोपटे, विद्यमान संचालक आमदार संग्राम थोपटे, सोमनाथ वचकल, पोपट सुके, विकास कोंडे, दत्तात्रेय भिलारे, शैलेश सोनवणे, किसन सोनवणे यांच्या अर्जावर हरकत घेतली. राजगड कारखान्यावर पुणे जिल्हा सहकारी बँक आणि शिखर बँकेचे सुमारे 15 कोटींचे कर्ज थकीत आहे. त्यावेळी वरील आठ उमेदवार हे तत्कालीन संचालक होते. अर्जामध्ये वरील सातही उमेदवारांनी जिल्हा बँक व शिखर बँकेचा थकबाकीदार नसल्याचा दाखला जोडलेला नाही. त्यामुळे या सात संचालकांना अपात्र ठरवावेत, अशा प्रकारची हरकत विरोधकांनी घेतली. तर कॉग्रेसकडून विरोधी पक्षाच्या 16 उमेदवारांच्या अर्जावर हरकत घेतली. विकास सोसायटी व बँकांची थकीत कर्जदार, सलग तीन वर्षे ऊस कारखान्यास घातलेला नाही आणि कारखान्याच्या कार्यक्षेत्राबाहेरील इतर कारखान्यास ऊस दिला. अशा प्रकारची कारणे हरकतींमध्ये दिली.

दरम्यान, बाळासाहेब गरून यांचा अर्ज कागदपत्रांच्या पूर्ततेवीना छाननी प्रक्रीयेत बाद झाला. छाननीला निकाल रात्री उशीरापर्यंत जाहीर होण्याची शक्यता असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते राजवाडा चौकात वाट बघत बसले आहेत. निवडणूक निर्णय अधिका-यांनी उमेदवारी अर्जाच्या छाननीत आमच्या हरकतींवर योग्य तो निर्णय नाही घेतला तर आम्ही न्यायालयात जाण्याच्या तयारीत असल्याचे भाजपाचे तालुकाध्यक्ष जीवन कोंडे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT