Aditya Thackeray
Aditya Thackeray sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

हा विषय घरात येऊन बसला आहे; ...अन्यथा गंभीर परिणाम होतील : आदित्य ठाकरेंचा इशारा

सरकारनामा ब्यूरो

सातारा : जागतिक तापमान वाढ हा विषय आता आपल्या घरात येऊन बसला आहे. या एका विषयावर संपुर्ण जग काम करत आहे. त्यात सहभागी होणे आपले काम आहे. हे काम आपण पुढाकार घेऊन न केल्यास आगामी काळात आपल्याला गंभीर सामाजिक प्रश्न, स्थलांतर आणि इतर आरोग्य प्रश्नांचा सामना करावा लागेल, अशी भीती व्यक्त करत शिवसेनेचे (Shivsena) युवा नेते व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी जीवनशैलीत सर्वांनी बदल करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्ते केले.

सातारा जिल्हा बँक आणि लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्लोबल वॉर्मिंग आणि ग्लोबल वॉर्निंग या विषयावर आयोजित कार्यशाळेचे उदघाटन आज आदित्य ठाकरे यांच्याहस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar), उपसभापती निलम गोऱ्हे (Nilam Gorhe), सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, खासदार वंदना चव्हाण (Vandana Chavan), आमदार मकरंद पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा बँक चेअरमन नितीन पाटील, लायन्सचे पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी बोलताना ठाकरे म्हणाले, सगळेच विषय मत, राजकारण नजरेसमोर ठेवून करायचे नसतात, अशी टिप्पणी त्यांनी केली. पर्यावरणीय बदलाचा सर्वाधिक फटका दरवर्षी शेतकरी वर्गाला बसत आहे. दुष्काळी भागात देखील आता ढगफुटी, अतिवृष्टी, गारपीट होत आहे. यामागे जागतिक तापमान हे कारण असल्याचे समोर येत आहे. नुकसानीची भरपाई सरकार निकषांनुसार देते. मात्र, त्यामुळे मूळ जागतिक तापमान हा विषय संपत नाही. आज मोठ्या प्रमाणात शहरीकरण होते, ही आनंदाची बाब मानली, तरी दुसरीकडे पर्यावरण ऱ्हास होतो, ही दुःखाची बाब आहे. विकास हवाच पण पर्यावरण पूरक हा आमचा अजेंडा आहे. हा अजेंडा सर्वांनी एकत्र न राबविल्यास आपणास आगामी काळात नेटच्या हॉटस्पॉट प्रमाणे ऑक्सिजन हॉटस्पॉट शोधावे लागतील.

आपली जीवसृष्टी आणि जीवनमान पंचतत्वावर अवलंबून असून ती पंचतत्वे आपल्याला आगामी काळात प्रदूषण मुक्त करावी लागतील. सर्वत्र पर्यावरण बदलाचे सूक्ष्म आणि उघड परिणाम दिसून येत आहे. ते कमी करणे, रोखणे आपल्या हातात आहे. या आपण अपयशी झाल्यास गंभीर सामाजिक परिणामाचा आपल्याला मुकाबला करावा लागेल, अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्ते केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT