Sadanand Sule-Supriya Sule Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sadanand Sule IT Notice : सरकारविरोधात बोलताच सदानंद सुळेंना इन्कम टॅक्सची नोटीस; सुप्रिया सुळेंची सोलापुरात माहिती

विश्वभूषण लिमये

Solapur, 13 August : भाजप सरकारच्या विरोधात जेव्हा मी बोलते, तेव्हा माझ्या पतीला (उद्योजक सदानंद सुळे) नोटीस येते. प्राप्तीकर विभागाची (इन्कम टॅक्स) सदानंद सुळे यांना सोमवारीच (ता. 12 ऑगस्ट) नोटीस आली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिव स्वराज्य यात्रा सोलापूर आहे. यात्रेसाठी सोलापूरमध्ये (Solapur) आलेल्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी सदानंद सुळे (Sadanand Sule) यांना आलेल्या नोटिशीचा उल्लेख केला.

आम्ही विरोधात बोललो म्हणून सीबीआय, ईडी (ED) आदी केंद्रीय एजन्सीच्या चौकशीचा ससेमिरा पाठीमागे लावला जातो, असलं गलिच्छ राजकारण आम्ही कधी केलं नाही. मी जेव्हा जेव्हा सरकारच्या विरोधात बोलते, तेव्हा इनकम टॅक्स विभागाची सदानंद सुळे यांना नोटीस येतेच. मी किती वेळा पार्लमेन्टमध्ये बोलते, त्या दरम्यान त्यांना नोटीस येते, असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

त्या म्हणाल्या, या सरकार कडून माझ्या काहीच अपेक्षा नाहीत. फेक नॅरेटीव्हचा भाग ते म्हणतात. आता जे पोटात होत, ते ओठात आलं. नाती हा चॅनेलवर बोलायचं विषय नाही. माझं आयुष्य वास्तव आहे. टीव्हीवर दाखवून माला त्याचा तमाशा करायचा नाही. माझी नाती ही फक्त रक्ताची नसतात, तर ती प्रेमाची आणि विश्वासाचीही असतात. अदृश्य शक्तीने आमचं आयुष्य उद्‌ध्वस्त करण्याचं ठरवलं होत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. त्या प्रत्येक सुनावणीला मी दिल्लीला जाते. मात्र, आज जितेंद्र आव्हाड तिथे असणार आहेत. कोर्टात आमच्याकडून लढाई सुरूच राहील, असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

लोकसभेत ट्रम्प या चिन्हाला तुतारी नाव देण हा रडीचा डाव होता, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना लगावला. महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा याबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या, आम्ही चेहऱ्यात अडकत नाही. लोकसभेला सर्वात कमी जागा आम्ही घेतल्या. आम्हला पदात जास्त इंटरेस्ट नाही. मी कुठलाही पद अंक जेण्डरमध्ये मी अडकत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT