MP Supriya Sule
MP Supriya Sule sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

सुळेंना ईडीची नव्हे, इन्कम टॅक्सची नोटीस...सुप्रिया सुळे

हेमंत पवार

कऱ्हाड : ''सदानंद सुळे यांना इन्कम टॅक्सची नोटीस आली आहे. ईडीची नाही. आम्ही दोषी नाही आहोत असे सांगीतले आहे. मी तक्रार केली नव्हती. मी लढणार आहे,'' अशी स्पष्टोक्ती, खासदार सुप्रिया सुळे यांनी आज शुक्रवारी कऱ्हाड (जि. सातारा) येथे केली.

खासदार सुळे कऱ्हाड दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलत होत्या. आमदार शशिकांत शिंदे, सारंग पाटील, सत्यजितसिंह पाटणकर, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या संगीता साळुंखे, राजेश पाटील-वाठारकर, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील, माजी नगरसेवक सौरभ पाटील, नंदकुमार बटाणे, जयंत बेडेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ''सदानंद सुळे यांना इन्कम टॅक्सची नोटीस आली आहे. ईडीची नाही. आम्ही दोषी नाही आहोत असे सांगितले आहे. मी तक्रार केली नव्हती. मी लढणार आहे.'' अमोल मिटकरी यांच्या वक्तव्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे, असे सांगुन त्या म्हणाल्या, ''राज्यात, देशात महागाईचे मोठे आव्हान आहे. केंद्र सरकारकडे मी सातत्याने खासदार म्हणुन तो प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही केलेल्या सुचनांची अमंलबजावणी झाल्यास महागाईतुन काहीसा दिलासा मिळण्यास मदत होईल.''

गुणरत्न सदावर्तेंच्या प्रश्नावर त्यांनी प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव असतो आणि त्याचे संस्कार असतात. माझे भाग्य आहे की भारताचा सुपूत्र जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांचे माझ्यावर संस्कार आहेत. त्यामुळे असल्या गोष्टीवर बोलणे मला योग्य वाटत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतुन प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे त्याच्यावर झालेल्या संस्कारानुसार ते बोलत असतील. कोरोनातील मंत्र्यांची लाखोंची बिले आहेत. हा प्रश्न योग्य आहे. मी स्वतः आरोग्य मंत्र्यांना फोन करुन त्यांच्या भावना फोनवरुन बोलणार आहे, असेही त्यांनी सांगीतले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT